
no images were found
‘अंतर योग फाउंडेशन तर्फे सर्वात भव्य-दिव्य ‘महाचंडी होमा’चे आयोजन
महाराष्ट्र :२६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य दिव्य महाशिवरात्री महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन केल्यानंतर, आता ‘अंतर योग फाउंडेशन’, प्रख्यात आध्यात्मिक सद्गुरु, क्रांतिकारी महानायक आणि ज्ञानाचे महासागर आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाचंडी होमा’चे आयोजन २९-३० मार्च २०२५ रोजी, ग्रांडे बॅक्कैट, नेस्को, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे करत आहे. २९ आणि ३० मार्च २०२५ या दोन दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान हे आयोजन होणार आहे.
दोन दिवसांच्या या भव्य दिव्य आयोजनादरम्यान अंतर योग फाउंडेशनचे प्रख्यात अध्यात्मिक सदगुरू, आचार्य उपेंद्रजी यांनी रचलेल्या, आजतागायत हजारो लोकांना त्वरीत शक्ती, संपत्ती आणि विवेकबुद्धी एकत्रितपणे मिळवून देणाऱ्या ‘अंतर योग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधना’ या ग्रंथाचे लोकार्पण होणारआहे . तसेच विविध क्षेत्रातील १० यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांचा, त्यांना देवी दुर्गामातेचे मूर्त रूप समजून अंतर योग फाउंडेशन तर्फे सत्कार केला जाणार आहे. दोन दिवसांच्या या भव्य दिव्य आयोजनादरम्यान सहभागी झालेल्या साधकांना आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा, दैवी संरक्षण प्रदान करणारा आणि भौतिक सुख व भरभराट प्राप्त करून देणाऱ्या दुर्मिळ व त्वरित फलंदायी साधनांचा अनुभव मिळणार आहे. या महोत्सवात देशातील अनेक आध्यात्मिक गुरू, राजकीय नेते, उद्योगपती, क्रीडा व चित्रपट क्षेत्रातील दिग्गज आणि हजारो साधक सहभागी होतील. अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा ९१ -७७१०९ ४८४६१