no images were found
‘आंगन अपनो का’ मध्ये दिसले आयुषी, आदिती आणि नीता यांच्यातील घनिष्ठ बंध
सोनी सबवरील अलीकडील ‘आंगन अपनो का’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पित्या प्रती मुलीच्या अतूट प्रेमाची या हृदयस्पर्शी कथेची प्रेक्षकांशीही नाळ जुळली आहे. मालिकेत आयुषी खुराना ही पल्लवीची भूमिका साकारत आहे. आपल्या बहिणींच्या लग्नानंतर त्यांचे प्राधान्यक्रम बदलल्याचे पाहून पल्लवीने लग्नच न करण्याचा प्रण केला आहे. आपल्या वडिलांना एकटे सोडावे लागू नये म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री अदिती राठोड आणि नीता शेट्टी या तन्वी व दीपिका म्हणून थोरल्या बहिणींच्या भूमिकेत झळकत आहेत. या सर्वांचे व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा अगदीच वेगळे आहे. पल्लवी ही एक हट्टी स्वभावाची मुलगी असून ती जे मनात असेल तेच बोलते. तन्वी ही घाबरट आणि काहिशी संकोची आहे. दीपिका ही मजबूत आणि करिअर केंद्रीत मुलगी आहे.
सेट्सच्या पलीकडे ही या तिघींमध्ये भगिनीभाव कायम आहे. जेव्हा चित्रीकरण नसते तेव्हा या मुली आपल्या आवडीचे खाद्यपदार्थांची चव चाखतात अन् अमर्यादित गप्पा गोष्टींमध्ये रंगून जातात. एकमेकांना पाठबळ देण्यापासून ते चिमटे काढण्यापर्यंत त्यांच्यातील नाते हे खऱ्या खुऱ्या बहिणीं सारखेच आहे. जेव्हा ही कलाकार मंडळी आपापल्या भूमिकांत नसते तेव्हा आयुषी मोठ्या लडिवाळपणे अदिती आणि नीता यांना तनुदी आणि दीपुदी म्हणून पुकारते. हे त्रिकुट एका मन मोकळ्या संवादा दरम्यान चांगलेच रंगले. आपापल्या पात्रांचे आपल्या व्यक्तिमत्त्वात कोणते गुण आहेत तसेच पडद्यावर आणि पडद्यामागे तिघींतील घनिष्ठ नात्यांबद्दल ही त्यांनी माहिती दिली.
मालिकेत सर्वात धाकटी बहीणपल्लवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आयुषी खुराना म्हणाली की,“जेव्हा केव्हाही आम्ही तिघी एकत्र रीत्या शूटिंग करत असतो तेव्हा सेट्सवर नेहमीच भयंकर गोंधळ घालत असतो. आमच्यात एक टिपिकल बहिणींचे नाते आहे, त्यात आम्ही एकमेकांना छळतो, एकमेकींची चांगलीच खेचतो! दीपुदी आणि तनुदी सोबत पडद्यावरील आमचे सुंदर नाते हे माझ्यावैयक्तिक जीवनातील धाकट्या बहिणीसोबतच्या बंधासारखेच आहे.”
मालिकेतमधील बहीण तन्वीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती राठोड म्हणाली की,“मी एक अंतर्मुख स्वभावाची व्यक्ती आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी मला काही काळजा ऊद्यावा लागतो. मात्र आयुषी आणि नीतासोबत अगदी पहिल्याच दिवसापासून माझी नाळ जुळली अ न्सुदैवाने ती आजही तशीच कायम राहिली आहे. आमच्यातील या ताळमेळामुळेच एकत्रित रीत्या चित्रीकरण करते वेळी आम्ही खूप मजा लुटतो.”
मालिकेतील सर्वात थोरली बहीण दीपिकाची व्यक्तिरेखा निभावणारी अभिनेत्री नीता शेट्टी म्हणाली की,“दीपिकाच्या भूमिकेत मला माझे स्वत:चे प्रतिबिंब दिसते. जे की, करिअर केंद्रित, कुटुंबाला समर्पित आणि चिवटपणे आयुष्यातील संकटांतून मार्ग काढणारे आहे. पडद्यामागे आयुषी आणि अदिती सोबतचे माझे नाते हे पडद्यावरील घनिष्ठ मैत्री सारखेच आहे. जेव्हा चित्रीकरण होत नसते तेव्हा आम्ही हास्यविनोदात आकंठ बुडालेलो असतो, प्रत्येक गोष्ट एकमेकीं शी शेअर करत असतो. या दोघींसाेबतच्या उबदार नात्या प्रती मला खूप कृतज्ञता वाटते.”