Home सामाजिक २२ जानेवारीला कोल्हापुरातील १३ हजार घरात श्री राम मंदिर साकारणार : श्री. क्षीरसागर

२२ जानेवारीला कोल्हापुरातील १३ हजार घरात श्री राम मंदिर साकारणार : श्री. क्षीरसागर

0 second read
0
0
82

no images were found

२२ जानेवारीला कोल्हापुरातील १३ हजार घरात श्री राम मंदिर साकारणार : श्री. क्षीरसागर

 

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : ४९५ वर्षापूर्वी अयोध्येतील श्री राम मंदिर पाडून बाबराने बाबरी मस्जीद बांधली. सन १९९२ साली कारसेवकांनी बाबरी पतन करून या ठिकाणी पूर्ववत श्री राम मंदिर उभारण्याच्या कोट्यावधी हिंदुच्या इच्छेस नवसंजीवनी मिळवून दिली. जगातील कोट्यावधी हिंदुंच स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारताना दिसत असून, दि.२२ जानेवारीला श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या धर्तीवर कोल्हापुरात घरोघरी श्री राम मंदिर साकारणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. घरोघरी श्री राम मंदिर या संकल्पनेअंतर्गत श्री राम मंदिर प्रतिकृती आकारसेवा पुस्तिकेच्या वितरणास आज सुरवात करण्यात आली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, अयोध्येतील श्री राम मंदिर उद्घात्नाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रत्येक घरात श्री राम मंदिर साकाराव असा या संकल्पनेचा उद्देश आहे. या उपक्रमात १३ हजार कुटुंबांनी सहभाग नोंदविला आहे.या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रुपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा व इतर काही कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आला आहे. याच संकल्पनेअंतर्गत ‘‘श्रीराम मंदिरासोबत सेल्फी’’ हा एक उपक्रम राबविला जाणार असून यामध्ये सर्वांनी बनविलेल्या श्रीराम मंदिर ३डी प्रतिकृतीसोबत आपल्या कुटूंबाचा एक सेल्फी पाठवावयाचा असून, यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून १० कुटूंबांना अयोध्येला जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही सांगितले.

यावेळी श्री राम मंदिर प्रतिकृती आकारसेवा पुस्तिकेचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिका प्राप्त करण्यासाठी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाजवळ नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. पुढील दोन दिवस टप्प्याटप्प्याने १० स्टॉलद्वारे या पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. या सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, देवस्थान समिती मा.कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा.नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई सालोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहरप्रमुख नम्रता भोसले, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…