
no images were found
Revia UTTO ऑइल’च्या लॉन्चसह ब्रेक्स इंडिया’ची ट्रॅक्टर क्षेत्रातील बाजार स्थिती बळकट
ट्रॅक्टर वेट ब्रेक सिस्टीम्सकरिता आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम) असलेल्या ब्रेक्स इंडियाने (टीएसएफ समूहाचा भाग) Revia UTTO (युनिव्हर्सल ट्रॅक्टर ट्रान्समिशन ऑइल) च्या शुभारंभासह ट्रॅक्टर ऑइल बाजारात प्रवेश करण्याची घोषणा केली. हे धोरणात्मक पाऊल वाढत्या ट्रॅक्टर विभागात कंपनीचे स्थान आणखी मजबूत करते. तसेच Revia ब्रँड पोर्टफोलिओचा विस्तार करते.
Revia UTTO हे ट्रान्समिशन सिस्टीम्स, ऑइल ब्रेक्स, हायड्रॉलिक्स आणि आधुनिक ट्रॅक्टरच्या अंतीम ड्राइव्हमध्ये वापरण्यासाठी उच्च-कार्यक्षमतेचे यूनिव्हर्सल ल्युब्रिकंट आहे. गुळगुळीत, आवाज-मुक्त ब्रेक कामकाज वितरीत करण्यासाठी तयार केलेले, Revia UTTO API GL4 मानकांची पूर्तता करते. जे गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. याव्यतिरिक्त, हे फॉर्म्युलेशन टोकाच्या परिस्थितीमध्ये गंज संरक्षण आणि स्थिर कामगिरी बाजवते. ज्यामुळे ब्रेक आणि ट्रान्समिशन सिस्टीमच्या दीर्घायुष्यात योगदान मिळते.