no images were found
‘रब से है दुआ’मधील करणवीर शर्माने सांगितले आपल्या आयुष्याबद्दल..
प्र. ‘रब से है दुआ’ची संकल्पना आणि कथानक यांच्याबद्दल आम्हांला सांग. –उ. ‘रब से है दुआ’ या मालिकेचे कथानक हैदरशी विवाह केलेल्या दुआ यांच्याभोवती फिरते. शुध्द मनाची आणि साध्याभोळ्या स्वभावाची दुआ ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजत असते. तिचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुखात आणि सुरळीत चाललेले असते. पण तिच्या या समजुतीला एके दिवशी प्रचंड मोठा धक्का बसतो जेव्हा हैदर आपण दुसर््या मुलीच्या प्रेमात पडल्याचे तिला सांगतो तेव्हा. तिच्याशी लग्न करण्याची परवानगी तो दुआकडे मागतो, तेव्हा दुआ आपल्या आयुष्यात होत असलेल्या ह्या अन्यायाच्या विरोधात उभी राहते आणि पवित्र कुराण करीममध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यानंतर काय सांगितले आहे त्याचा योग्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःसाठी कशी उभी राहिल हे पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्कंठावर्धक असेल. ही कथा आणि त्यामागचा विचार यांचा प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच प्रभाव पडेल.
प्र. ह्या मालिकेची खासियत काय आहे? अन्य मालिकांपेक्षा ही कशी वेगळी आहे?- उ. मला वाटतं संकल्पना, कथानक, ह्या मालिकेमागचा विचार आणि यातील व्यक्तिरेखा ह्या ‘रब से है दुआ’ ह्या मालिकेला सध्या सुरू असलेल्या अन्य कुठल्याही मालिकांपेक्षा वेगळे बनवतात. ह्या मालिकेतून सादर केले जाईल की कशी दुआ आपल्या हक्कांसाठी उभी राहते आणि आपल्या पतीला पवित्र कुराण करीमचा अर्थ योग्य पद्धतीने समजावून सांगते, ज्याला दुआशी लग्न झाल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे आहे कारण त्याचे त्या दुसऱ्या मुलीवर प्रेम जडले आहे.
प्र. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काही सांग आणि हैदरची भूमिका साकारण्यासाठी तू कसा तयार झालास?- उ. हैदरची व्यक्तिरेखा वेगळी आणि आव्हानात्मक आहे त्यामुळेच ह्या मालिकेचा हिस्सा बनण्यासाठी मी तयार झालो. खरंतर, ही व्यक्तिरेखा मी ह्याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी वेगळी आहे. हैदर आपल्या जबाबदाऱ्या अगदी गांभीर्याने घेतो आणि जेव्हापासून त्याचे वडिल त्याच्या आईला सोडून गेले आणि त्यांनी दुसरे लग्न केले, तेव्हापासून तो आपल्या कुटुंबातील सर्वांचीच काळजी घेत आहे. तो जास्त बोलत नाही. तो शांत स्वभावाचा असून आपल्या वागण्याचे सर्वांच्या हृदयाला स्पर्श करतो. तो एक यशस्वी व्यावसायिकही आहे आणि ह्या मालिकेत त्याचा प्रवास अगदी खास आहे. मला खात्री आहे की त्याच्यामुळे ह्या मालिकेला मिळणाऱ्या योगदानामुळे सर्वचजण थक्क होतील.
प्र. ह्या व्यक्तिरेखेमध्ये शिरण्यासाठी तू कशी तयारी केलीस?- उ. हैदरची भूमिका मी ह्याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी असल्यामुळे मला मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या ह्या शांत स्वभावाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी तयारी करावी लागली. तसेच मला त्याची देहबोली, हातवारे करण्याची पद्धत यांचे बारकावे शिकावे लागले. लूकसाठी थोडे वजनही वाढवावे लागले आणि त्यासाठी माझा आहार वाढवावा लागला. मला ह्या गोष्टीची सवय नव्हती कारण त्याआधी मी अगदी कडक डाएटवर होतो.
प्र. तुझ्या सहकलाकार अदिती आणि रिचा यांच्यासोबत चित्रीकरण करण्याचा आत्तापर्यंतचा तुझा अनुभव कसा राहिला आहे?- उ. आम्ही फारसे चित्रीकरण केले नसले तरी जेवढा काही थोडा वेळ आम्ही एकत्र व्यतीत केला आहे तो अगदी मजेदार होता. मला आशा आहे की प्रेक्षकांना आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडेल. अदिती आणि रिचा ह्या दोघी उत्तम अभिनेत्री आहेत आणि ‘रब से है दुआ’ मध्ये आमचा उत्तम प्रवास प्रेक्षकांनी पाहावा यासाठी मी उत्सुक आहे.