
no images were found
महिला दिनानिमित्त कोल्हापूरात महा रक्तदान शिबीर
कोल्हापूर(प्रतिनिधी):-जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने, रक्तमित्र स्व .धनंजय_पाडळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ओंकार वेल्फेअर फौंडेशन व मैत्री दिंडी ग्रुप तर्फे करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंती निमित्त9 मार्च2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत महिलांसाठी विशेष रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आभास पाटील यांनी दिले आहे . सदरचे रक्तदान शिबीर शिवाजी मंदिर, अपना बँके शेजारी, शिवाजी पेठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
याचे आयोजक जीवनदाता सामाजिक संस्था, “जिंदगी ना मिलेगी दोबारा”, प्रवास मैत्रीचा हे सोशल मिडिया ग्रुप आहेत.
या उपक्रमात जास्ती जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 8451033013 व
98906 54281 या क्रमांकावर संपर्क साधावा असे नमूद केले आहे.