
no images were found
यूवा सादर करत आहे क्विप आणि ल्यूमिनो या दोन नव्या प्रीमियम पेन्सिली
मुंबई, : नवनीत एज्युकेशनच्या यूवा या स्टेशनरी ब्रँडतर्फे यूवा क्विप आणि यूवा ल्यूमिनो या नव्याकोऱ्या पेन्सिली सादर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि कलाकारांसाठी खास तयार करण्यात आलेल्या पेन्सिलींमध्ये उत्तम ग्रिप, स्मूथ लिखाण आणि डार्क फिनिश ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांची किंमत प्रत्येकी ₹६ इतकी आहे.
क्विप आणि ल्यूमिनो पेन्सिलींना मेटॅलिक फिनिश पॅकेजिंग देण्यात आले आहे. त्यामुळे या पेन्सिलींना अभिजातता, टिकाऊपणा आणि भक्कमपणा मिळतो. स्मूथ लिखाणासाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या या पेन्सिली अल्ट्रा-डार्क 2बी लीडने तयार करण्यात आल्या आहेत, जेणेकरून सुबक व सुस्पष्ट लिखाण करता येईल. या दोन्ही पेन्सिली त्यांचा उच्च दर्जा व विचारपूर्वक करण्यात आलेल्या डिझाइनसाठी ओळखल्या जातात.
यूवा क्विपच्या १० पेन्सिलींच्या पाकिटात षटकोनी आकाराच्या पेन्सिलींच्या ५ वैशिष्ट्यपूर्ण छटांचा समावेश असलेल्या पेन्सिली असून युझर्सना प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक पेन्सिलीवर प्रेरणा देणारे वचन कोरण्यात आले आहे. या पाकिटासोबत एक शार्पनर आणि खोडरबर या दोन वस्तूही देण्यात येतात. त्यामुळे लिखाणासाठी व चित्र काढण्यासाठी हा एक परिपूर्ण संच झाला आहे.
‘यूवा ल्यूमिनो’च्या १० पेन्सिलींच्या पॅकमध्ये त्रिकोणी आकाराच्या पेन्सिलींच्या ५ चमकदार फ्लोरेसंट छटा असून या पेन्सिलींमुळे लिखाणाला एक ‘हट के रंग’ मिळतो. या पेन्सिली अधिक सोयीस्कर व्हाव्या यासाठी या पेन्सिलींसोबत इरेझर टिप (मागील बाजूस असलेला खोडरबर) आणि त्यासोबत मोफत शार्पनरही देण्यात आले आहे.
“यूवा क्विप आणि यूवा ल्यूमिनो या पेन्सिली सादर करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. या पेन्सिली खरोखरच खास आहेत. त्यांचे चमकदार रंग, आकर्षक डिझाइन आणि उच्च दर्जाचे फिनिश यामुळे या पेन्सिली सगळ्यांना नक्कीच आवडतील. या पेन्सिलींचा लुक आणि उत्तम दर्जा यांची सांगड घालण्यासाठी आमच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. स्टाइल, उपयुक्तता आणि परवडणारी किंमत यांचे हे कॉम्बिनेशन ग्राहकांना निश्चितच भावेल,” असे यूवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. अभिजीत सान्याल म्हणाले.
“यूवातर्फे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण प्रोफेशनल्ससाठी नावीन्य, उत्कृष्ट दर्जा आणि सर्वोत्तम मूल्य देण्याच्या बांधिलकीने काम करण्यात येते. पेपर स्टेशनरी क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड म्हणून, आता आम्ही नॉन-पेपर स्टेशनरीच्या क्षेत्रातही नव्या कल्पनांसह विस्तार करण्याचा संकल्प केला आहे. यूवा क्विप आणि यूवा ल्यूमिनो पेन्सिलींच्या लाँचच्या निमित्ताने एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास, दर्जात्मक उत्कृष्टता आणि अभिनव दृष्टिकोन हे पैलू या नव्या सादरीकरणातही दिसून येतील, हे आमचे उद्दिष्ट आहे. नवनीतच्या ६५ हून अधिक वर्षांच्या अनुभवाच्या बळावर या श्रेणीमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे यूवा स्टेशनरी विभागाचे उपाध्यक्ष सिद्धांत गाला म्हणाले.
या नव्या उत्पादनांमधून, दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्याची यूवाची बांधिलकी दिसून येते. यूवाच्या या नव्या पेन्सिली आघाडीची रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून या पेन्सिलींच्या माध्यमातून यूवा दैनंदिन लिखाण