
no images were found
नवनीतच्या ‘यूवा’तर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल लाँग बुक सीरिजचे अनावरण
महाराष्ट्र: ‘यूवा’ या नवनीत एज्युकेशन हाऊसच्या भारतातील प्रमुख स्टेशनरी ब्रँडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज लाँग बुक सीरिज लाँच करण्यात आली आहे. महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांना ही लिमिटेड एडिशन समर्पित करण्यात आलेली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेली ही बुक्स, मराठा साम्राज्याच्या या महान नेतृत्वाच्या शौर्यकथा आणि समृद्ध इतिहास यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाचे कलात्मक आणि ऐतिहासिक चित्रण दर्शवण्यासाठी या वह्या विचारपूर्वक डिझाइन करण्यात आल्या आहेत. या वह्यांच्या कव्हर्सवर महाराजांचे साहस, विवेकबुद्धी आणि दूरदृष्टी नेतृत्व हे गुण प्रतिबिंबित केले आहे, ज्यायोगे त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण जिवंत होऊ शकतात. विद्यार्थ्यांना माहिती मिळावी आणि ते प्रेरित व्हावेत या उद्दिष्टाने वह्यांवर बारकाव्यांसह असलेली डिझाइन्स आणि आकर्षक चित्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे ही बुक्स फक्त स्टेशनरी न राहता, इतिहासाला दिलेली मानवंदना ठरावीत.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, इतिहासप्रेमी आणि इतरांसाठी ही लाँग बुक्स म्हणजे कार्यक्षमता आणि प्रेरणेचा उत्तम मिलाफ आहेत. या वह्यांचा उपयोग अभ्यासाच्या नोट्स लिहिण्यासाठी किंवा वैयक्तिक भावना व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. या वह्यांमुळे तरुणांना महाराजांच्या अजिंक्य वृत्तीपासून प्रेरणा मिळेल आणि रोजच्या जगण्यात महाराजांचा वारसा जिवंत राहील.
‘यूवा’च्या ‘यूवा’ स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. अभिजीत सान्याल म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशातील एक महान नेतृत्व होते आणि त्यांचा वारसा आपल्याला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. या स्पेशल एडिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराजांची विवेकशीलता आणि शौर्य यांतून साहसातून प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या खास पद्धतीने, रोजच्या शिक्षणात महाराजांची यशोगाथा जिवंत ठेवून उद्याचे नेतृत्व घडवण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे.महाराष्ट्रातील आघाडीच्या स्टेशनरीच्या दुकानांमध्ये ही लाँग बुक्स उपलब्ध असून यांतून सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची शिक्षणासोबत सांगड घालण्याचा ‘यूवा’ची बांधिलकी दिसून येते, ज्यायोगे भारताच्या समृद्ध भूतकाळाशी तरुणांची नाळ जोडलेली राहील, हे सुनिश्चित होते.