Home मनोरंजन गाथा नवनाथांची मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा

गाथा नवनाथांची मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा

8 second read
0
0
128

no images were found

गाथा नवनाथांची मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा

मुंबई:‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने मागील वर्षभरापासूनप्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलंय. नाथ संप्रदाय आणि त्याविषयीची माहिती प्रेक्षकांना यामालिकेच्या माध्यमातून मिळतेआहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसारख्या नाथांच्या कथा प्रेक्षकांना पाहता येताहेत. मालिकेत आता चौरंगीनाथांचा नाथ संप्रदायातला प्रवास सुरू झाला असून आता पुढे भर्तरीनाथांच्या जन्माची कहाणी सुरू होणार आहे.

        टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका घेऊन सोनी मराठी आली आणि तीजनसामान्यांत लोकप्रिय झाली आहे. नवनाथांच्या जन्मांच्या आणि कार्याच्या कथा, ज्या आत्तापर्यंत कधीच दृश्य स्वरूपात बघितल्या नव्हत्या, त्या या मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत. माशाच्या पोटातूनआलेले मच्छिन्द्रनाथ, गोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथ, मातीतून अवतरलेले गहिनीनाथ आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथ; या नाथांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला असून आता चौरंगीनाथहीकार्य सुरू करतील. मालिकेत आता सूर्यपुत्र म्हणून मानले जाणारे भर्तरीनाथ यांची जन्मकहाणी सुरू होणारआहे. भर्तरीनाथ यांचा जंगलातला जन्म, जंगलातलं बालपण, त्यानंतर  सर्वसामान्य दाम्पत्यानी त्यांचा केलेला सांभाळ; हा सगळा प्रवास मालिकेत बघता येणार आहे. भर्तरीनाथ यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर घेतलेला संन्यास, नाथ संप्रदायातला प्रवेश, उज्जैन इथलं कार्य तसंच वैराग्यशतक, शृंगारशतक, नीतिशतक अशा तीन ग्रंथांचं लिखाण हा जीवनप्रवासही मालिकेत मांडण्यात येणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…