no images were found
स्कोडा ऑटो इंडियाकडून एनीटाइम वॉरंटी पॅकेज लॉन्च
कोल्हापूर : विक्रीच्या संदर्भात २०२२ ला सर्वात मोठे वर्ष म्हणून संपादित केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडिया आपल्या पहिल्या सादरीकरणासह २०२३ चा शुभारंभ करत आहे. नवीन कार नाही, तर नवीन, क्रांतिकारी, ग्राहक उपक्रम, ज्याचा मालकीहक्क अनुभव व ग्राहक समाधान वाढवण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम आहे एनीटाइम वॉरंटी, ज्यामध्ये १ वर्ष/२०,००० किमी वॉरंटी पॅकेज आहे, जे कोणत्याही विद्यमान प्रमाणित किंवा विस्तारित वॉरंटीज वाढवण्यासाठी वापरता येऊ शकते.स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, स्कोडा ऑटो इंडियासाठी पुढील मार्ग फक्त नवीन कार्स असणार नाही, तर ग्राहकांना अद्वितीय मालकीहक्क व देखभाल अनुभव देणारे विविध नवोन्मेष्कारी उपक्रम सादर करत आम्ही २०२३ ची सुरूवात केली. एनीटाइम वॉरंटी ही अशीच एक ऑफरिंग आहे, जी अॅक्सेलरेटिंग ग्रोथप्रती आमच्या मार्गात ग्राहक समाधान व त्रास-मुक्त मालकीहक्क अनुभवाच्या आमच्या कटिबद्धतेचे पालन करते.
स्कोडा ऑटो इंडिया ४-वर्षे/१००,००० किमी प्रमाणित वॉरंटीसह भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत अग्रस्थानी आहे, जेथे उद्योगामध्ये प्रमाणित वॉरंटी ३-वर्षे/७५,००० किमी आहे. तसेच स्कोडाने आपल्या पीस ऑफ माइंड उपक्रमांतर्गत ४-वर्षांची प्रमाणित वॉरंटी ५व्या व ६व्या वर्षांपर्यंत/१५०,००० किमीपर्यंतत वाढवण्याचा पर्याय दिला. नवीन एनीटाइम वॉरंटी विद्यमान प्रमाणित व विस्तारित वॉरंटीजमध्ये भर आहे आणि ग्राहकांना जवळपास ८ वर्षे/१५०,००० किमी (जे पहिले असेल ते) चे अतिरिक्त वॉरंटी कव्हरेज देते. एनीटाइम वॉरंटी विशेषत: कोडियक (टीडीआय), सुपर्ब, ऑक्टाव्हिया, येटी व रॅपिडच्या जुन्या पिढ्यांकरिता १-वर्ष/२०,००० किमी कालावधीसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ७ वर्षांच्या आतील आणि/किंवा १३०,००० किमीपेक्षा कमी मायलेज असलेली कोणतीही स्कोडा तपासणी व सर्टिफिकेशन नंतर एनीटाइम वॉरंटीसाठी पात्र आहे. प्रमाणित, विस्तारित किंवा एनीटाइम वॉरंटी यापैकी कोणतीही वॉरंटी पुढील मालकाला हस्तांतरणीय आहे. विद्यमान वॉरंटी संपलेले ग्राहक देखील एनीटाइम वॉरंटी खरेदी करू शकतात, पण त्यासाठी कारने तपासणी मानकांची पूर्तता करणे गरजेचे आहे.