Home सामाजिक पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज -परमपूज्य श्री  काडसिद्धेश्वर स्वामी जी     

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज -परमपूज्य श्री  काडसिद्धेश्वर स्वामी जी     

12 second read
0
0
200

no images were found

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज -परमपूज्य श्री  काडसिद्धेश्वर स्वामी जी        

 कोल्हापूर –  सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा  सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा  भूकंप ठरलेला आहे . त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे  स्वाभाविकच आहे .‘वसुदैव कुटुंबम्’ सह अवघ्या विश्व कल्याणाच्या पसायदान परंपरेतून आपल्या सर्वाच्या वतीने या भूकंपामध्ये मृत पावलेल्या सर्व मनुष्य आणि प्राणीमात्रांना आपण श्रद्धांजली अर्पण  करू या आणि कोणत्याही परिस्थितीत भूगर्भाच्या आत अथवा भूगर्भावर अतिरेकी प्रमाणात वाढविणे हस्तक्षेप होऊ नये यासाठी सर्वांनीच दक्षतेने सजग राहणे हीच काळाची गरज आहे. हाच या महा भयानक भूकंपाने पुन्हा एकदा अवघ्या जगालाच आणि अवघ्या मानव जातीला दिलेला आहे इशारा आहे ‘ असे हितगुजपर मनोगत सिद्धगिरी कणेरी मठाचे परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले. तसेच  निसर्ग आणि पर्यावरण समतोल राखणे  आणि  विनयशील पणे निसर्गाशी समरस होऊन पंचमहाभूतांचे संतुलन राखणे हे काळाची गरज आहे आणि त्यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठीच अगदी प्राथमिक शाळा पासून ते संशोधक विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजातील विविध घटकावरील विविध प्रकल्प राबवणे गरजेचे आहे त्यासाठी शासनासह विविध संस्था आणि समाज घटकांनी वेळी पुढाकार घ्यावा असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …