Home क्राईम पुणे पोलिसांनी केली तब्बल ११ हजार गुन्हेगारांवर कारवाई

पुणे पोलिसांनी केली तब्बल ११ हजार गुन्हेगारांवर कारवाई

2 second read
0
0
101

no images were found

पुणे पोलिसांनी केली तब्बल ११ हजार गुन्हेगारांवर कारवाई

पुणे : पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर पुण्यात गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली. कोयत्या गँगपासून अगदी छोट्यामोठ्या कारणावरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० हजार ९७३ गुन्हेगारांवर पुणे शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

१२ गुन्हेगारी टोळ्यांमधील ७५ जणांवर मोक्का कारवाई केली. तसेच ४३ गुन्हेगारांना तडीपार केले. झोपडपट्टीदादा विषयक एमपीडीए कायद्यान्वये ४ गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ऑल आऊट व कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकिंग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवल्या. सात वर्षांवरील रेकॉर्डवरील एकूण २२ हजार ६०७, मालमत्तेविरुद्धचे ६ हजार ६११ गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती कोल्हापूर : एसूस …