
no images were found
‘अंतर योग फाउंडेशन” तर्फे मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्रीचे आयोजन,
मुंबई, : आध्यात्मिक सद्गुरु, क्रांतिकारी महानायक आणि ज्ञानाचे महासागर आचार्य उपेंद्रजी यांच्या अतुल्य अशा मार्गदर्शनाखाली ‘अंतर योग फाउंडेशन’ २६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्रीचे आयोजन करत आहे. २४ तास चालणाऱ्या या अध्यात्मिक महोत्सवात तब्बल ३ लाख भाविक सहभागी होणे अपेक्षित आहे. आरोग्य, प्रगती, भरभराट, ज्ञान, महिला सक्षमीकरण या विविध पैलूंभोवती या अनोख्या अशा सोहळ्याची भिस्त असेल. सामुहिक हीलिंग, वैद्यकीय तपासण्या, शक्तिशाली साधना, तत्काळ परिणाम अशी या अयोजानाची वैशिष्ट्ये आहेत. त्या माध्यमातून अर्थ, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील नेतृत्त्व उभे करण्यावर भर असेल आणि त्याचवेळी सक्षम नागरिक निर्माण व्हावेत, असेही या आयोजनाचे उद्दिष्ट असेल. महाशिवरात्री विनामूल्य नोंदणीसाठी : https://mahashivratri.antaryogfoundation.in/ येथे रजिस्टर करा.हे आयोजन मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथील हॉल क्रमांक १ येथे होत असून भारतभरातील आघाडीचे उद्योजक, खेळाडू , चित्रपट सृष्टीतील दिग्गज व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वे यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर तब्बल ३ लाख भाविक या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार आहेत.
दुर्मिळ व आधुनिक अशी शिवसाधना, शक्तिपात दीक्षा आणि अनोखी अशी ज्ञानसत्रे यांच्या माध्यमातून आचार्य उपेंद्रजी यांनी अगणित लोकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यांचे आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध यांमधील ज्या विविध समस्या होत्या, त्या त्यांनी लीलया सोडवल्या आहेत. हेच फायदे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता हे भव्य असे आयोजन केले जात आहे.
पथदर्शी अशा या प्रयत्नाचा भाग म्हणून ‘अंतर योग फाउंडेशन’ने साधनेचे त्वरित परिणाम वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी भाविकांसाठी ऐच्छिक रक्ततपासणीचे आयोजन केले आहे. अभूतपूर्व असे हे आयोजन असून त्याद्वारे प्राचीन अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा असा संगम अभूतपूर्व अशा प्रमाणावर साधला जाणार आहे.‘पितृ ऋण मुक्ती साधना’ या आगळ्यावेगळ्या साधनेतून कोट्यवधी पितरांची मुक्ती होणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये जो मुख्य अडथला ठरतो (पितृ दोष), तो तत्काळ दूर करणारी ही साधना आहे.
त्याचबरोबर या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवमंत्र आणि स्तोत्र यांचा जप केला जाणार असून त्यात २५,००० भाविक सहभागी होणार आहेत. त्याद्वारे पवित्र ऊर्जा आणि दिव्य सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. या पवित्र अशा सामुहिक पठणाच्या माध्यमातून नकारात्मकता नष्ट होते आणि संपूर्ण वातावरण दैवी सकारात्मकतेने भरले जाते. त्यातून एकूण शारीरिक कल्याण साधले जाते आणि शक्तिशाली असे कंप निर्माण होतात. मनःशांती प्राप्त होते आणि लक्ष अविचल राहते. यासोबतच अत्यंत फलदायी ५ कोटी गणेशमंत्रांचा सामूहिक जप होणार आहे. भारताच्या भविष्यासाठी दूरदृष्टी असलेले, नीतिमूल्ये जपणारे सक्षम नेतृत्त्व निर्माण करण्यासाठी हा खास आध्यात्मिक उपक्रम हाती घेतला गेला आहे.या मुहूर्तावर २४-तासांच्या यज्ञाचाही समावेश आहे. हे सत्र तपस्वी ब्राह्मणांच्या हातून संपन्न होणार आहे आणि त्यातून मानवी जातीच्या कल्याण व भरभराटीसाठी दैवी आशीर्वाद मिळविण्याचे लक्ष्य आहे.
या भव्य आणि दिव्य अशा आयोजनाचा एक भाग म्हणजे, आचार्य उपेंद्रजी गणपती अथर्वशीर्षावरील महाग्रंथाचे प्रकाशन करणार आहेत. या अनोख्या अशा सत्रांतून याआधी कधीही समोर आले नाही असे आध्यात्मिक सत्य समोर येते आणि त्यातून कालातीत ज्ञान आणि मानव जीवनासाठी उपयुक्त असे अतुल्य मार्गदर्शन प्राप्त होते. भावी भक्कम नेते आणि आदर्श समाज निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने हे तयार केले गेले असून या उत्तम अशा कलाकृतीमधून ज्ञान समोर येते आणि त्यातून आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्याची आणि चांगले माणूस होण्याची एक प्रक्रीया निर्माण होते.
आचार्य उपेंद्रजी हे एक आध्यात्मिक गुरु असून त्यांचे शिष्य जगभर पसरलेले आहेत. ते म्हणतात, “महाशिवरात्री हे काही केवळ एक आध्यात्मिक आयोजन नाही तर भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, महामारी, इत्यादी संकटांपासून आपल्या देशातील सात्विक , सदाचारी नागरिकांचे संरक्षण करणे, त्यांना सबळ करणे व त्यांची सर्वांगीण उन्नत्ती साधणे यासाठी हे एक अत्यंत आवश्यक पाऊल आहे. हा उत्सव म्हणजे भारताचे भवितव्य पुन्हा एकदा लिहिण्याची सुवर्णसंधी असून त्यातून सर्वांसाठी आरोग्य, भरभराट आणि आध्यात्मिक वृद्धी साध्य करायची आहे.”
या भव्य अशा उत्सवाच्या अयोजानाचा भाग म्हणून ‘अंतर योग फाउंडेशन’ विशेष अभिमंत्रित औषधे जगासमोर आणणार असून त्यातून झटकन उपचार व कल्याण साधणे अपेक्षित आहे.त्याचबरोबर शिव तांडव कार्यक्रम आणि हृदयस्पर्शी असा भावगीतांचा सोहळा सादर होणार असून त्यात अनेक नावाजलेले कलाकार सहभागी होणार आहेत. या संपूर्ण आयोजनात ३ लाखांहूनही अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांना अन्नदान आणि प्रसाद यांच्या माध्यमातून पवित्र व शक्तिशाली मंत्रांनी अभिमंत्रित प्रसाद दिला जाणार आहे. त्यातून हे आयोजन म्हणजे सर्वांसाठी समावेशक आणि समृद्ध करणारा अनुभव सिद्ध होणार आहे.‘अंतर योग फाउंडेशन’ समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना या अतुलनीय अशा अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहे. त्यातून आरोग्यपूर्ण, भरभराट झालेला आणि अध्यात्मिकदृष्ट्या संपन्न असा भारत निर्माण करण्याचे समर्पित उद्दिष्ट आहे.
या आयोजनाची माहिती :
● तारीख : २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७ ते २७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७ वा.
● कालावधी : २४ तास
● स्थळ : हॉल क्रमांक १, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई
● प्रवेश : विनामूल्य
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी, कृपया संपर्क: 91 77109 48461
महाशिवरात्री नोंदणीसाठी : https://mahashivratri.antaryogfoundation.in/