
no images were found
छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभात चित्रपटगृह येथे मर्दानी खेळाचे आयोजन
कोल्हापूर, – नुकताच प्रदर्शित झालेल्या, बहुचर्चित छावा चित्रपटाला मायबाप रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभात चित्रपटगृहासमोर प्रेक्षकांचे ढोल- ताशाच्या गजरात आणि मर्दानी खेळाने स्वागत करण्यात आले.छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित, विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. त्याचबरोबर येथील प्रभात, रॉयल, शाहू, पद्मा या एकपडदा चित्रपटगृहांबरोबर मल्टिप्लेक्स येथेही प्रदर्शित झाला.
दरम्यान, सर्वच ठिकाणी चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निमित्ताने प्रभात चित्रपटगृह येथे ढोल-ताशाच्या कडकटात मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी दाद दिली. येथे उभारलेल्या संभाजी महाराजांच्या पोस्टरला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी नारायण रुईकर, वरुण रुईकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
कर्मचारीही फेटे बांधून ऐतिहासिक असलेल्या या चित्रपटाच्या स्वागतासाठी प्रभात-रॉयलचे फेटे बांधलेले कर्मचारी प्रेक्षकांचे स्वागत करीत होते. अगदी तिकीट विक्री करणारा कर्मचारीही फेटा बांधून होता.