
no images were found
“कधीही पुरे न पडणारे”: भारताच्या 60% सँडविच जनरेशनला भविष्यात आर्थिक सुरक्षेची चिंता, एडलवाइज लाईफच्या अभ्यासातून निष्कर्ष समोर
आपले पालक आणि मुलांना सर्वोत्तम जीवन उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केल्याने, भारतातील सँडविच पिढी स्वतःच्या भविष्यासाठी तयार नाही असे वाटते. “मी कितीही बचत केली किंवा गुंतवणूक केली तरी ती भविष्यासाठी पुरेशी नाही,” असे मत 60% लोकांनी व्यक्त केले आहे.
सँडविच जनरेशनची व्याख्या 35-54 वर्षे वयोगटातील व्यक्ती म्हणून केली जाते. ही पिढी त्यांचे वृद्ध पालक आणि वाढत्या वयांची मुले अशा दोन पिढ्यांना आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देतात. जीवन विमा कंपनीने यूगोव्ह (YouGov)च्या सहकार्याने 12 शहरांमधील या पिढीतील 4,005 प्रतिसादकर्त्यांचे दृष्टिकोन, विश्वास आणि आर्थिक सज्जतेची पातळी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण केले.
एडलवाइज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सुमित राय म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आमच्या ग्राहकांशी झालेल्या संवादातून, सँडविच जनरेशन त्यांचे पालक आणि मुलांची देखभाल करण्याच्या चक्रात कसे जीवन जगत आहेत हे आम्ही बारकाईने पाहिले. ‘गरजा’ इच्छांच्या मोबदल्यात येत नाहीत असे महत्त्वाकांक्षी जीवन उपलब्ध करताना त्यांना आरोग्यसेवा आणि शिक्षणासारख्या आवश्यक गोष्टी सक्षम करायच्या आहेत. हे प्रामुख्याने त्यांच्या आर्थिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला चालना देते आहे. या प्रक्रियेत, ही सँडविच जनरेशन अनेकदा त्यांची स्वतःची स्वप्नं मागे ढकलते. ज्यामुळे आपण भविष्यासाठी तयार नाही अशी त्यांची धारणा होते.”