
no images were found
HDFC बँकेने लॉन्च केले ‘अनमोल सॅलरी अकाऊंट’ – PSU कर्मचाऱ्यांसाठी भारताचे पहिले सायबर फ्रॉड कव्हर समाविष्ट करणारे खाते
नवी दिल्ली, : HDFC बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आज भारतातील पहिले PSU (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) सॅलरी अकाऊंट- ‘अनमोल सेव्हिंग्स अकाऊंट’ लॉन्च केले, जे सायबर फसवणुकीसमोर कव्हर देते.
HDFC बँक आपल्या सेव्हिंग्स खात्याच्या उत्पादनात निरंतर काही ना काही नवीनता आणत असते. वरिष्ठ नागरिक, कामकाजी व्यावसायिक, महिला यांसारख्या वेगवेगळ्या गरजा असणाऱ्या ग्राहक विभागांना समोर ठेवून बनवलेल्या सेविंग्स खात्याच्या ‘स्पेशल’ श्रेणीचा एक भाग म्हणून HDFC बँक वरिष्ठ नागरिकांना 1.5 लाख रु. पर्यंतचे सायबर फ्रॉड कव्हर* प्रदान करते तर व्यावसायिकांसाठी सायबर फ्रॉड कव्हर* 25000 ते 50000 रु. पर्यंत आहे. तसेच ‘स्पेशल गोल्ड वूमन’ खाते महिलांना 5 लाख रु. पर्यंत कॅन्सर कव्हर* देते.
अनमोल सेविंग्स खात्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
- सायबर फ्रॉड कव्हर – ग्राहकांना 25000* रु. पर्यंतच्या सायबर फ्रॉडसमोर संरक्षण देते.
- कौटुंबिक फायदे – 5 कौटुंबिक सदस्यांपर्यंत शून्य बॅलन्स सॅलरी फॅमिली अकाऊंट आणि लॉकरचे लाभ
- विमा कव्हर* – ग्राहकांना OPD कव्हरेज, 30 लाख रु. पर्यंतचे टॉप अप प्लान आणि शून्य खर्चाचे 15 लाख रु. च्या अपघात विमा कव्हरसहित व्यापक हेल्थ कव्हरचा लाभ मिळेल.
- विशेष ऑफर्स – खास ऑफर्ससह मोफत प्लॅटिनम डेबिट कार्ड आणि त्यात दर वर्षी जास्तत जास्त 8 वेळा भारतातील विमानतळांवर लाऊन्जमध्ये मोफत प्रवेश
- महारत्न PSU कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या सीमांव्यतिरिक्त पूरक / अतिरिक्त गृह कर्ज
HDFC बँकेचे कंट्री हेड – पेमेंट्स, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर फायनॅन्स अँड मार्केटिंग श्री. पराग राव म्हणाले, “PSU कर्मचाऱ्यांसाठी देशातील पहिले सायबर कव्हर समाविष्ट असलेले सॅलरी अकाऊंट प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांचे बँकिंग व्यवहार अधिकाधिक डिजिटल होत चालल्यामुळे हे फीचर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘अनमोल सेविंग्स अकाऊंट’ लॉन्च करून HDFC ने ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन्सवरचा आपला फोकस बळकट केला आहे. हे एक नवीन प्रकारचे सेविंग्स अकाऊंट उत्पादन आहे, ज्यामध्ये PSU कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रेफरेन्शियल कर्ज दर, सॅलरी ओव्हरड्राफ्टची वाढीव मर्यादा, हेल्थ कव्हर यांसारखे अनेक लाभ आहेत.”
बँकेने हे डायनॅमिक उत्पादन दाखल केले आहे, जे सेविंग्स खात्याचे पारंपरिक लाभ तर देतेच, पण त्याच बरोबर पहिल्या वर्षी मोफत लॉकरचा लाभ, शून्य बॅलेन्सचे सॅलरी अकाऊंट, अमर्याद ATM व्यवहार आणि मोफत डिमांड ड्राफ्ट यांसारखे इतरही अनेक फायदे प्रदान करते.
*अटी आणि शर्ती लागू. विमा कव्हर विमा भागीदारांकरवी प्रदान करण्यात येते.