Home उद्योग देशातील सर्वोत्कृष्ट 30 हेअरस्टायलिस्टमध्ये कोल्हापूरचा हेअरस्टायलिस्ट हेमंत शरद काशीद; कोल्हापूरसाठी अभिमानास्पद

देशातील सर्वोत्कृष्ट 30 हेअरस्टायलिस्टमध्ये कोल्हापूरचा हेअरस्टायलिस्ट हेमंत शरद काशीद; कोल्हापूरसाठी अभिमानास्पद

10 second read
0
0
21

no images were found

देशातील सर्वोत्कृष्ट 30 हेअरस्टायलिस्टमध्ये कोल्हापूरचा हेअरस्टायलिस्ट हेमंत शरद काशीद; कोल्हापूरसाठी अभिमानास्पद

 

कोल्हापूर,: गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट या राष्ट्रीय पातळीवरील हेअरस्टायलिस्ट स्पर्धेत इमेज सलून (राजारामपुरी) येथील हेमंत शरद काशीद हे टॉप तीस फायनलिस्टमध्ये निवडले गेले आहेत. ही कोल्हापूरसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. केसांचा रंग तसेच केसांची निगा राखणारा गोदरेज  कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (GCPL) चा प्रमुख व्यावसायिक हेअर ब्रँड गोदरेज प्रोफेशनलने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हेअरस्टायलिस्टची हटके प्रतिभा ओळखणे तसेच त्यांच्या व्यावसायिक वाढीस समर्थन देणे हे गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटचा हेतू आहे.

     मुंबईत झालेल्या या महाअंतिम फेरीत देशभरातून निवडलेले 30 प्रतिभावान सहभागी झाले होते. प्रत्येक फायनलिस्टने रॅम्पवर गोदरेज प्रोफेशनलच्या क्युरेटेड हेअर कलर कलेक्शनचे अत्यंत देखणे सादरीकरण केले. इतर 29 फायनलिस्टसह ग्रँड फिनाले इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या हेमंत यांनी हेअरकलर्सचे उत्तम प्रदर्शन केले. 30 कुशल व्यावसायिकांच्या  या पहिल्या तुकडीला यियान्नी त्सपाटोरी, गोदरेज प्रोफेशनलचे हेअरचे क्रिएटिव्ह डायरेक्टर, आदरणीय मार्गदर्शक शैलेश मूल्या, नॅशनल टेक्निकल हेड आणि नजीब-उर-रेहमान, गोदरेज प्रोफेशनलचे टेक्निकल अँबेसेडर यांच्या नेतृत्वाखाली मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळाली.

    अभिनव ग्रांधी, महाव्यवस्थापक, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL), म्हणाले, “6 दशलक्षाहून अधिक सलूनसह, भारताचा सलून उद्योग हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे, तरीही प्रतिभावान हेअर स्टायलिस्ट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा अभाव आहे. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटला मिळालेल्या उदंड प्रतिसादासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्हाला याचा अभिमान वाटतो. हे व्यासपीठ प्रतिभावान केशरचनाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची केवळ संधी देत नाही तर या क्षेत्रातील शिक्षण तसेच प्रशिक्षणाप्रती आमची बांधिलकी देखील दर्शवते. या उपक्रमाद्वारे, वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संधीसह हेअर स्टायलिस्टला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील सलून व्यावसायिकांना संधी आणि त्यांची प्रगती करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दिशेने हे आमचे एक पाऊल आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…