no images were found
विनयभंग प्रकरणी आरोपीला दंड व सश्रम कारावासाची शिक्षा
नाशिक : ठक्कर बाजार येथील बसस्थानकात जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी ईशाद राजमोहमंद मणियार यास एका वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या ३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकात बसमध्ये जात होत्या. त्याचवेळेस गर्दीचा फायदा घेत आरोपी ईशाद याने त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सलीम तडवी यांनी युक्तिवाद केला. गुन्हा शाबीत झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी समीर जी. बावकर यांनी आरोपी ईशादला १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार जी. ए. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.