no images were found
डिपार्टमेन्ट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विदयार्थीला आर्यलंड मध्ये ‘ रिसर्च एक्सलन्स‘ ॲवार्ड
कोल्हापूर : डिपार्टमेन्ट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विदयापीठ कोल्हापूर मधील इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेचे माजी विदयार्थी श्री. दिनेश गावडे यांना आर्यलंड येथील टिंडल नॅशनल इन्स्टिटयूट या युरोप मधील अग्रगण्य संशोधन संस्थेत उत्कृष्ट संशोधनासाठीचा रिसर्च एक्सलन्स हा पुरस्कार प्राप्त झाला. श्री. दिनेश गावडे हे सामान्य कुटंबातील, ग्रामीण पार्श्वभूमीचे विदयार्थी. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीतून बी.टेक. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. मूळच्या कष्टाळू स्वभावाला विदयापीठाच्या संशोधन वातावरणाची जोड मिळाली. रशियन, जापनीज अशा परदेशी भाषांचा बी.टेकच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. बी.टेक. नंतर टिंडल नॅशनल इन्स्टिटयूट येथे रिसर्च असिस्टंट म्हणून ते रूजू झाले. त्यानंतर एम.एस. (बाय रिसर्च) या पदव्युत्तर पदवीसाठी त्यांची निवड झाली. भारतीय रूपयात सुमारे २० लाख स्टायपेंड व फी माफी या सुविधा त्यांना युरोपियन युनियनमार्फत प्राप्त झाल्या. एम.एस. नंतर त्यांना पी.एच.डी साठी प्रवेश मिळाला. यावेळीही फी माफी व सुमारे २० लाख रूपये स्टायपेंड मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीमस ‘एम.सी.सी.आय.’ या रिसर्च सेंटर मार्फत या सुविधा प्राप्त झाल्या. ॲन्टीना डिझायन, वायरलेस सेन्सिंग डिव्हायसेस, आर.एफ..आय.सी. हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. त्यांनी एकूण १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित केले असून त्यांन २ पेटंट प्राप्त झाले आहेत.
टिंडल नॅशनल इन्स्टिटयूट ही युरोपमधील अग्रगण्य संशोधन संस्था असून सुमारे ६०० संशोधक व अभियंते कार्यरत आहेत. संस्थेचे वार्षिक उत्पन्न ३० दशलक्ष पौंड आहे. अशा नामांकित संस्थेचा उत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती श्री. दिनेश गावडे यांनी दूरध्वनीवरून दिली. शिवाजी विदयापीठ व डिपार्टमेन्ट ऑफ टेक्नॉलॉजी या विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्यूनिकेशन शाखा समन्वयक डॉ. एस. बी. चव्हाण, इंटरनॅशनल अफेअर्स सेल डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे समन्वयक प्रा. उदय आंनदराव पाटील व स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.