Home सामाजिक सॅमसंगकडून कम्‍युनिटी व एन्‍व्‍हायरोन्‍मेंट थीम्‍ससाठी वेगवेगळ्या स्‍कूल आणि युथ ट्रॅक्‍ससह ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’चा सीझन ३ लाँच 

सॅमसंगकडून कम्‍युनिटी व एन्‍व्‍हायरोन्‍मेंट थीम्‍ससाठी वेगवेगळ्या स्‍कूल आणि युथ ट्रॅक्‍ससह ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’चा सीझन ३ लाँच 

3 min read
0
0
33

no images were found

सॅमसंगकडून कम्‍युनिटी व एन्‍व्‍हायरोन्‍मेंट थीम्‍ससाठी वेगवेगळ्या स्‍कूल आणि युथ ट्रॅक्‍ससह ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’चा सीझन ३ लाँच 

         

नवी दिल्‍लीसॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने फाऊंडेशन फॉर इनोव्‍हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ट्रान्‍सफर (एफआयटीटी), आयआयटी दिल्‍ली, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि युनायटेड नेशन्‍स इन इंडिया यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोगास‍ह त्‍यांचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’च्‍या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसह सॅमसंगचा देशातील तरूणांमध्‍ये नाविन्‍यपूर्ण विचारसरणी व समस्‍या निवारण संस्‍कृती बिंबवण्‍याचा मनसुबा आहे. 

सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वरिष्‍ठ संचालक व सायण्टिस्‍ट ‘जी’ डॉ. संदीप चॅटर्जी आणि भारतातील युनायटेड नेशन्‍स रेसिडण्‍ट कोऑर्डिनेटर श्री. शोम्‍बी शार्प यांच्‍या हस्‍ते सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ चे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी इतर मान्‍यवर देखील उपस्थित होते.

हा सीएसआर उपक्रम नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स आणि व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत सामाजिक प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतांना सन्‍मानित करतो, तसेच सॅमसंगचा दृष्टिकोन #TogetherforTomorrow #EnablingPeople ला दृढ करतो.

यंदा ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्‍ट ट्रॅक्‍स – स्‍कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले आहेत. हे प्रत्‍येक ट्रॅक विशिष्‍ट थीमला चालना देण्‍याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करतात. दोन्‍ही ट्रॅक्‍स एकाच वेळी राबवण्‍यात येतील, ज्‍यामधून सर्व विद्यार्थ्‍यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळेल.

स्‍कूल ट्रॅक १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो ‘कम्‍युनिटी अँड इन्‍क्‍लुजन’ थीमवर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक वंचित समूहांची प्रगती करण्‍याचे, सामाजिक नवोन्‍मेष्‍कारांच्‍या माध्‍यमातून सर्वांना आरोग्‍य व सामाजिक सर्वसमावेशकता उपलब्‍ध करून देण्‍याचे महत्त्व सादर करतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर इंडिया’ आहे.   

दुसरीकडे, युथ ट्रॅक १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करण्‍यासह थीम ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्‍टेनेबिलिटी’वर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यासाठी व शाश्‍वततेला चालना देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना महत्त्व देतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर वर्ल्‍ड’ आहे.

सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क म्‍हणाले, ”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही नाविन्‍यपूर्ण संकल्‍पना व परिवर्तनात्‍मक तंत्रज्ञानांच्‍या माध्‍यमातून भावी पिढीला प्रेरित व आकार देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमचे मिशन सामाजिक परिवर्तनासाठी नवप्रवर्तक व उत्‍प्रेरकांच्‍या भावी पिढीला चालना देण्‍याच्‍या अवतीभोवती फिरते. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो भारतातील तरूणांना अर्थपूर्ण नाविन्‍यता सादर करण्‍यास सक्षम करण्‍यासाठी व्‍यासपीठ ठरत आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात.

पहिल्‍या दोन पर्वांमध्‍ये आम्‍हाला या सीएसआर उपक्रमाचा भावी पिढीवर सकारात्‍मक परिणाम होताना दिसण्‍यात आले आहे, ज्‍यांनी नव्‍या उंची गाठत त्‍यांच्‍या सामाजिक उद्योजकता प्रवासाला सुरूवात केली आहे. तिसऱ्या पर्वामध्‍ये दोन वेगवेगळ्या ट्रॅक्‍सच्‍या सादरीकरणासह आमचा एकाच वेळी भारतासाठी व जगासाठी समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे या प्रमुख सीएसआर उपक्रमासह आमचा देशातील नाविन्‍यपूर्ण इकोसिस्‍टमला प्रबळ करण्‍याप्रती आमची भूमिका बजावण्‍याचा मनसुबा आहे.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …