
no images were found
युवा मास्टरस्ट्रोक ने भारतभरातील छोट्या चित्रकारांना दिले अभिव्यक्तीचे व्यासपीठ
नवनीत एज्युकेशनच्या युवा स्टेशनरीला ‘युवा मास्टरस्ट्रोक’ ची यशस्वी सांगता झाल्याचे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. ही स्पर्धात भारतातील विविध राज्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
युवा मास्टर स्ट्रोक हा एक खास प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुलांना चित्रकलेतून त्यांची कल्पकता उलगडण्यासाठी सक्षम करण्यात येते. या स्पर्धेला तब्बल दोन दशकांचा वारसा असून या आयकॉनिक स्पर्धेचा या वर्षी २०वा वर्धापन दिन होता.
२०२३च्या पर्वापासून या स्पर्धेमध्ये २२ राज्यांमधील तब्बल ५२५१ शाळांनी या स्पर्धेत सहभागल नोंदवला आणि सुमारे १३.६ लाख विद्यार्थ्यांनी आपले कलागुण आणि कल्पनाशक्तीचे प्रदर्शन केले. सहभागींची तीन वयोगटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक वयोगटाली त्यांच्या चित्रांसाठी विशिष्ट संकल्पना देण्यात आली होती.
“भारतातील अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांची कल्पकता व त्यांच्या प्रतिभेचा गौरव करणाऱ्या युवा मास्टरस्ट्रोकच्या अजून एका यशस्वी स्पर्धेचे आयोजन केल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.”, असे युवाचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले. ते पुढे म्हणाले, “या स्पर्धेमध्ये लहान कलाकारांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ मिळतेच, त्याचप्रमाणे कलात्मक अभिव्यक्ती आणि रसग्रहणाच्या संस्कृतीला चालना मिळते. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो.”
युवाची धारणा आहे की, चित्रकला ही अभिव्यक्तीची जागतिक भाषा असल्याने हे माध्यम मुलांना त्यांचे विचार आणि भावना मूकपणे मांडण्याची वैशिष्ट्यपूर्ण संधी देते आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांचे पोषण करते. युवा मास्टरस्ट्रोक हे त्याचेच द्योतक आहे.