no images were found
पावसाळ्यामध्ये खोबरेल तेल आणि अॅलो व्हेरा तुमच्या केसांचे नुकसान होण्यापासून कशाप्रकारे संरक्षण करतात?
पावसाळा उन्हाळ्यातील उकाड्यापासून उत्साहवर्धक दिलासा देतो, ज्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जाते. उत्साहवर्धक पाऊस आणि थंडावा उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा देतात. पण, पावसाळ्यामध्ये वाढलेली आर्द्रता आणि पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. हवेतील अतिरिक्त ओलाव्यामुळे तुमचे केस कुरळे होतात, ज्यामुळे केसगळती होऊ शकते.
पावसाळ्यादरम्यान, नियमित हेअर केअर नित्यक्रम राखणे पावसामुळे केसांचे अधिक नुकसान होण्याला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचे आहे. केस कुरळे होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि केसांमधील नैसर्गिक पोषणाच्या संरक्षणासाठी सर्वात गुणकारी मार्ग म्हणजे नियमितपणे हेअर ऑइलिंग. अनेक हेअर ऑइल पर्याय उपलब्ध असले तरी तुमच्या केसांच्या विशिष्ट समस्यांनुसार योग्य घटक असलेल्या हेअर ऑइलची निवड करणे महत्त्वाचे आहे. पॅराशूट अॅडवान्स्ड अॅलो व्हेरा एनरिच्ड कोकोनट हेअर ऑइल नॉन-स्टिकी, हलका पर्याय आहे, ज्यामध्ये अॅलो व्हेरा व कोकोनट बेस्ड हेअर ऑइलचे फायदे आहेत. यामुळे केस कुरळे होण्यावर नियंत्रण राहत ते कोमल होतात, तसेच पावसाळ्यादरम्यान सामान्य केसांच्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण होते.
कोकोनट बेस्ड हेअर ऑइलसह अॅलो व्हेराचे हे अद्वितीय मिश्रण तुमच्या केसांमध्ये जवळपास १० स्तरांपर्यंत खोलवर* (अस्वीकृती – टेक्निकल संशोधनावर आधारित) जाते, ज्यामुळे केस कोमल होतात आणि कुरळे होण्यावर प्रतिबंध ठेवण्यास मदत होते. अॅलो व्हेरा पावसाळ्यादरम्यान केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम घटक म्हणून ओळखले जाते. एकत्रित केल्यास, कोकोनटचे पोषण आणि अॅलो व्हेराचे कंडिशनिंग फायदे केस कुरळे होण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केस कोमल व आटोपशीर होतात. यासह तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या स्टाइलमध्ये केशभूषा करू शकता.
तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हेअर ऑइलचा वापर करू शकता. टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत हेअर ऑइलसह मसाज करा आणि फक्त ३० मिनिटे हेअर ऑइल केसांमध्ये ठेवल्यानंतर केस धुवा. तर मग, यंदा पावसाळ्यामध्ये या सोप्या गुणकारी हेअर केअर नित्यक्रमासह तुमच्या केसांना आवश्यक पोषण द्या.