
no images were found
रॉयल एनफिल्ड हंटर ३५० ने ५ लाख विक्रीचा टप्पा पार केला
रॉयल एनफिल् या मिडसाइझ मोटरसायकल श्रेणीमधील (२५० सीसी – ७५० सीसी) जागतिक अग्रणी कंपनीला घोषणा करताना अभिमान वाटत आहे की, त्यांची कॉम्पॅक्ट व स्टायलिश रोडस्टर हंटर ३५० ने ५००,००० विक्रीचा टप्पा पार केला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच करण्यात आलेली हंटर झपाट्याने विकसित होत असलेल्या मोटरसायकल मॉडेल्सपैकी एक आहे, जेथे या मोटरसायकलचे जगभरात पाच लाखांहून अधिक समाधानी ग्राहक आहे.
शहरातील एक्स्प्लोरर्स आणि आधुनिक काळातील राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या हंटर ३५० मध्ये रॉयल एनफिल्डच्या डीएनएसह गतीशीलता, स्टाइल आणि उत्साहवर्धक राइडचे उत्तम संयोजन आहे. आकर्षक स्टायलिंग, डायनॅमिक कार्यक्षमता आणि मॉडर्न-रेट्रो आकर्षकतेसह हंटर ३५० आजच्या तरूण राइडर्ससाठी पसंतीची आहे. शहरातील वर्दळीमधून नेव्हिगेट करायचे असो किंवा शहरातील आकर्षक स्थळाला भेट द्यायची असो किंवा खुल्या रस्त्यांवरून साहसी राइडचा आनंद घ्यायचा असो, तरूण राइडर्स सुलभ गतीशीलता आणि आत्मविश्वासपूर्ण मनुव्हरेबिलिटीसाठी हंटर ३५० ची निवड करत आहेत.
हंटर ३५० च्या व्यापक लोकप्रियतेमधून भारतातील आणि जगभरातील विविध बाजारपेठांमधील मोटरसायकलचे वैविध्यपूर्ण अपील दिसून येते. ही मोटरसायकल कॉम्पॅक्ट, गतीशील आणि वैशिष्ट्य-संपन्न मोटरसायकलचा शोध घेणाऱ्या राइडर्ससाठी पसंतीची आहे, जिच्यामध्ये दैनंदिन व्यावहारिकतेसह अस्सल मोटरसायकलिंगचा रोमांच सामावलेला आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी रॉयल एनफिल्डचे चीफ कमर्शियल ऑफिसर यदविंदर सिंग गुलरिया म्हणाले, ”हंटर ३५०ने शहरातील आणि डायनॅमिक वातावरणांमधील मोटरसायकलच्या भूमिकेला नव्या उंचीवर नेले आहे. अल्पावधीत ५००,००० विक्रीचा टप्पा गाठण्यामधून हंटर ३५० साठी ग्राहकांचे अमाप प्रेम आणि विश्वास दिसून येतो. हंटर ३५० च्या सतत वाढत असलेल्या उत्कट राइडर्सच्या समुदायाने या मोटरसायकलला मध्यम आकाराच्या मोटरसायकल श्रेणीमध्ये अद्वितीय बनवले आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचे आभार मानतो, जे आम्हाला एक्स्प्लोरेशन, स्वयं-अभिव्यक्ती आणि राइडिंगचा आनंद देणाऱ्या मोटरसायकल्स निर्माण करण्यास प्रेरित करत आहेत. रॉयल एनफिल्ड भौगोलिक क्षेत्रांमधील हंटर ३५० ग्राहकांसोबत राइड्सचे आयोजन करत हा टप्पा साजरा करणार आहे, ज्यामधून खराखुरा राइडिंगचा अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होईल.”
हंटर ३५० च्या लोकप्रियतेमधून नाविन्यपूर्ण, स्टायलिश आणि शक्तिशाली मोटरसायकल्स वितरित करण्याप्रती रॉयल एनफिल्डचे मिशन दिसून येते. भारतात, हंटर ३५० ने मेट्रो शहरांव्यतिरिक्त द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमध्ये झपाट्याने प्रवेश केला आहे. भारताव्यतिरिक्त हंटर आता एपीएसी, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.