Home मनोरंजन दिवाळीच्या आधीची पिक्चरवाली दिवाळी एकत्र होणार साजरी

दिवाळीच्या आधीची पिक्चरवाली दिवाळी एकत्र होणार साजरी

1 second read
0
0
63

no images were found

प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२’ची उत्सुकता

दिवाळीच्या आधीची पिक्चरवाली दिवाळी एकत्र होणार साजरी

दिवाळीच्या सणासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र प्रवाह पिक्चर पुरस्कारांच्या रुपात दिवाळीआधीच पिक्चरवाली दिवाळी साजरी होणार आहे. हा सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सर्वोत्त्तम कलाकृतींचा सन्मान, सोबतीला फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स या सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात आपल्या अष्टपैलू अभिनयाने सर्वांना आनंद देणाऱ्या अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गौरवण्यात आलं. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात उमेश कामत, वैदेही परशुरामी, रुपाली भोसले आणि रसिका सुनिलच्या रोमॅण्टिक अंदाजासोबतच उर्मिला कोठारे, संस्कृती बालगुडे आणि माधवी निमकरची ठसकेबाज लावणी पाहायला मिळेल. अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या नृत्यातून चित्रपट सृष्टीमधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व ‘दादा कोंडके’ यांना मानवंदना देणार आहे. आदर्श शिंदे आणि छोट्या उस्तादांचं धमाकेदार गाणं आणि सिद्धार्थ जाधव-विशाखा सुभेदार यांचं बहारदार सूत्रसंचालन या सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचा अनोखा अंदाज देखील या सोहळ्यात पाहायला मिळेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…