Home सामाजिक शिवाजी विद्यापीठात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

शिवाजी विद्यापीठात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

0 second read
0
0
40

no images were found

शिवाजी विद्यापीठात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभागात दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त अधिविभागातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले त्याचे उद्घाटन गांधी अभ्यास केंद्र व कै. श्रीमती. शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले.  याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत आणि मानसशास्त्र विभाग यामध्ये निश्चितच पुढाकार घेईल. अधिविभागात डॉ. प्रदीप पाटील (आकार फाउंडेशन, सांगली) यांचे ‘बदलत्या काळातील स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर व्याख्यान झाले त्यावेळी ते म्हणाले आदिम काळापासून स्त्री आणि पुरुष तीन वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला गेला होता नर आणि मादी, पुरुष आणि बाई आणि सध्या प्रचलित असलेला स्तर म्हणजे स्त्री आणि पुरुष स्त्रियांना जर मानसिक निरोगी व्हायचा असेल तर विवेकी दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. समाजाने जर विवेक स्वीकारला नाही तर तो  उत्क्रांती काळातील नर आणि मादी या स्तरावर अडकून राहील. स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खंबीरतेचे कौशल्य अवगत करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष कोंबडे हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉ.अश्विनी पाटील यांनी केले.प्राध्यापक मिलिंद सावंत यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी माने तर  आभार प्रदर्शन कु. ज्योती निकाळजे या विद्यार्थिनींनी केले. सदर कार्यक्रमासाठी अधिविभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहवर्धक सहभाग नोंदवला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…