
no images were found
भाजपची देशभरातून पाचवी यादी जाहीर!
सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापलं असून आता सोलापूरमधून राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
दरम्यान, भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिलादेखील उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.
नागपूर- नितीन गडकरी, नंदूरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर, जालना- रावसाहेब दानवे सांगली- संजयकाका पाटील, पुणे – मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपने रविवारी पाचव्या यादी जाहीर केली असून देशभरातील १११ उमेदवार घोषित केले आहे. यामध्ये दिग्गजांना नारळ दिल्याचं दिसून येत आहे. वरुण गांधी यांच्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितीन प्रसाद यांना तिकीट दिलं आहे.तसेच गाझियाबाद मतदारसंघातून दोनवेळा खासदार असलेले व्हीके सिंह यांचं तिकीट कापून अतुल गर्ग यांना दिलं आहे. यादी जाहीर होण्यापू्र्वीच जनरल व्हीके सिंह यांनी सोशल मीडियावर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.