no images were found
31 मार्च पर्यंत सुट्टीदिवशीही घरफाळा कार्यालय व नागरी सुविधा केंद्रे सुरू
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाने 31 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेस मुदतवाढ जाहिर केली आहे. या सवलत योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना होण्यासाठी दि.31 मार्च 2024 अखेर घरफाळा कार्यालय व सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार दि.23 ते 31 मार्च 2024 पर्यंत घरफाळा विभागाची सर्व कार्यालये व नागरी सुविधा केंद्रे शनिवार व रविवार या सुटटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. यामध्ये दि.23 ते 30 मार्च पर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व दि.31 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहे. तरी शहरातील थकबाकीदार व चालू मागणी असणा-या मिळकतधारकांनी आपला घरफाळा, पाणीपट्टी, परवाना फी भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
दि.1 एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 अखेर रू 63 कोटी 62 लाख 66 हजार 842 रुपये घरफाळा जमा
50 टक्के सवलत योजनेमधून 7413 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. या सवलतीमधून 10 कोटी 66 लाख 86 हजार 382 रुपये रक्कम जमा झाली आहे. तर दि.16 फेब्रुवारी ते दि.22 मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत योजनेमधून 6023 इतक्या मिळकत धारकांनी सवलत घेतली आहे. या सवलतीमधून 5 कोटी 20 लाख 39हजार 467 रक्कम जमा झाली आहे. दि.1 एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 अखेर रू 63 कोटी 62 लाख 66 हजार 842 रुपये इतका घरफाळा जमा झाला आहे.