no images were found
घरात फ्रिज नसला तरी चालेल, पण मुलांसाठी पुस्तकांचे कपाट हवे,,,प्रा. जॉर्ज क्रुज
कोल्हापूर ( प्रतिनिधी):- चूल आणि मूल हेच आयुष्य न मानता संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत जिद्दीने वन अधिकारी पदावर झेप घेतलेल्या आपल्या सुनेचा जाहीरपणे सासू आणि दिराने आयोजित केलेला कौतुक सोहळा शहरात चर्चेचा विषय बनलाय.मुस्कान लॉन येथे हा सोहळा झाला. संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत असतानाच आपल्या करियरवर लक्ष केंद्रीत करून वन अधिकारी पदावर विराजमान होण्याची किमया येथील अस्मत उर्फ महेक फिरोज शेख या गृहिणीनं करून दाखवली आहॆ. तिच्या या यशाने आनंदित झालेल्या आई समान सासू सौ शमा जमीर शेख शेख आणि भावासमान दिर अमीन शेख यांनी जाहीर कौतुक सोहळा आयोजित करून युवा पिढीला या सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणा देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
प्रख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि विजयश्री फौंडेशनचे प्रमुख प्रा जॉर्ज क्रुज, लाचलुचपतविरोधी पथकाच्या प्रमुख, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, मुस्लिम समाजबांधवांच्या बैतुलमाल कमिटीचे प्रमुख विश्वस्त जाफरबाबा सैय्यद, जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, प्रख्यात पोटविकारतज्ञ डॉ वसीम मुल्ला मोरया हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ संगीता निंबाळकर, डॉ. संतोष निंबाळकर,, डॉ बिपीन परीख, सौ. अंजली परीख, निवृत्त पोलीस उपअधीक्षक दुर्योधन पवार, निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. के. पाटील, बी. ए. पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उदयसिंह पाटील,शाहू छत्रपती फौंडेशन चे सचिव जावेद मुल्ला भोपाळचे उद्योजक मेहबूब शेख,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पारिवारिक कौतुक सोहळा संपन्न झाला.
मुलगी ओझं नसते तर आईवडिलांच्या डोक्यावर सन्मानाचा मुकुट मणी ठरू शकते याचा प्रत्यय या सोहळ्यानं आणून दिला. यावेळी बोलताना प्रा जॉर्ज क्रुज यांनी मुलीला ओझं न मानता तिला दर्जेदार शिक्षण दिल्यास ती कुटुंबाला सर्वोच्च सन्मान मिळवून देऊ शकते, असं मत व्यक्त केलं. घरात एक वेळ फ्रिज घेऊ नका, पण मुलांसाठी पुस्तकांचं कपाट जरूर असू द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला. जाफरबाबा सैय्यद, पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. सूत्र संचालन बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी केलं. संयोजन नवाब शेख, विक्रांत आत्याळ कर, वदूद बागवान, फिरोज शेख, साहिल जमादार, महंमद मुल्ला, आदिनी केलं. मुशताक तहसीलदार आणि सोनाली रायकर यांनी सादर केलेल्या गीत मैफिलीनं या सोहळ्याची सांगता झाली.