no images were found
“रन फॉर स्वदेशी” या उपक्रमाचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून “रन फॉर स्वदेशी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत राबविण्यात आला.
ही जनजागृती दौड सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.45 वाजता स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दौडीची सुरुवात उचगाव NH-4 महामार्ग येथून सुरू झाली. दौड चे उद्घाटन विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिलेल्या राष्ट्रभक्ती, स्वावलंबन, शिस्त आणि देशसेवेच्या संदेशाचा प्रसार करणे तसेच “स्वदेशीचा” विचार युवकांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या दौडीत महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी एन. एस. एस. प्रमुख प्रियांका गायकवाड, साक्षी माने, अमर मुरगी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या उपक्रमामुळे युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सामाजिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेम वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.