no images were found
घरफाळा विभागाकडून पाच दिवसात 1 कोटी 90 लाख वसूल
कोल्हापूर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दंडात 80 टक्के सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. सदरची सवलत योजना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्ग दि.15 ते 20 जानेवारी 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत रुपये 1 कोटी 90 लाख इतकी थकीत रक्कम जमा झाली आहे. यामध्ये 1328 थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 80 टक्के सवलत योजनेमधून रुपये 75 लाख इतकी सवलत मिळकतधारकांना देण्यात आलेली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने थकीत रक्कमेवर 80 टक्के सवलत योजना लागु केलेने मोठया प्रमाणावर थकबाकीदार हे थकीत रक्कम भरुन सवलत योजनेचा लाभ घेत आहेत. सवलत योजना लागु करुन ही जे थकबाकीदार थकीत रक्कम भरणार करत नाहीत अश्या थकबाकीदारांवर मिळकती सिल करणे अथवा मिळकतीवर बोजा नोंद करणेची कारवाई करण्यात येणार आहे. तरी थकबाकीदार यांनी थकीत रक्कम भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.