no images were found
रंकाळा उद्यानामध्ये गुरुवारी स्वच्छता मोहिम
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- महापालिकेच्यावतीने गुरुवार दि.23 जानेवारी 2025 रोजी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण रंकाळा उद्यानामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. हि स्वच्छता मोहिम सकाळी 7.30 ते 10 वाजपर्यंत राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या स्वच्छता मोहिमेत जास्तीजास्त नागरीकांचा सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संघांनी मोठया संख्येसह स्वच्छतेच्या साहित्यासह सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.