
no images were found
घरफाळा थकबाकीपोटी संकल्पसिध्दी अपार्टमेंट मधील 24 मिळकती सिल
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांवर सिल करण्याची कार्यवाही घरफाळा विभागाच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. आज क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरातील, संकल्पसिध्दी अपार्टमेंट मधील 24 सदनिकांवर विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदान अंतर्गत घरफाळा विभागाने सिल करण्याची कारवाई केली आहे.
तरी शहरातील ज्या थकबाकीदारांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केली नसेल त्यांनी आपला थकीत घरफाळा त्वरित भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदरची मिळकत सिल किंवा बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.