
no images were found
लोकप्रिय अभिनेता कुंवर विक्रम सोनी झी टीव्हीच्या ‘वसुधा’मध्ये
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका तिच्या आकर्षक नाट्य, गुंतागुंतीचे नाते आणि अनपेक्षित वळणांच्या अचूक मिलाफासह प्रेक्षकांना मोहित करत आहे. अलीकडेच, माधवच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेता कुंवर विक्रम सोनीच्या प्रवेशाने ह्या मालिकेच्या कथानकात एक रोमांचक नवीन वळण आले.
सर्जनशीलतेची आवड असलेला माधव अनाथ आहे आणि चंद्रिकाच्या (नौशीन अली सरदार) कंपनीत ग्राफिक डिझायनर आणि छायाचित्रकार म्हणून काम करतो. चंद्रिका आणि माधव यांच्या एक विशेष नाते असून तिची आशा आहे की एक दिवस तो वसुधा (प्रिया ठाकूर) शी लग्न करेल. या ताज्या डायनॅमिकने तणाव निर्माण झाला असून चंद्रिका आणि वसुधा यांच्यातील नातेसंबंधांची पुनर्व्याख्या झाली आहे आणि त्यामुळे आता कथानकामध्ये अधिक कारस्थाने आणि भावनिक जटिलता दिसून येणार आहे.
कुंवर विक्रम सोनी म्हणाला, “या शोमध्ये भूमिका साकारणे म्हणजे मला माझ्या मुळांकडे परतल्यासारखे वाटत आहे कारण या शोची पार्श्वभूमी राजस्थान असून ती माझी जन्मभूमी आहे. ही माझ्यासाठी अगदी ओळखीची असून इथे माझ्यासाठी नक्कीच एक प्रकारचा सहजपणा आहे. टेलिव्हिजनवर माझे पुनरागमन या मालिकेतील कलाकार आणि क्रू यांच्याकडून मिळालेला आपलेपणा आणि पाठिंबा यांमुळे आणखी खास बनले आहे. मला मी इथल्या कुटुंबाचा एक भाग असल्यासाखा वाटतो. माझी व्यक्तिरेखा माधव हा आजच्या जगात खरोखरच अतिशय खास प्रकारचा आहे. तो एक अशी व्यक्ती आहे जो सचोटी, आदर आणि खरी करुणा पसरवतो. तो नक्कीच एक ग्रीन फ्लॅग आहे. आजकाल असे लोक मिळणे आणि दुर्मिळ गोष्ट आहे. मला प्रिय असलेल्या मूल्यांशी जुळणारे पात्र साकारणे हे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे आणि माधवने त्या दृष्टीला मूर्त रूप दिले आहे.”
चंद्रिका आणि वसुधाच्या आयुष्यात माधवच्या प्रवेशामुळे, ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीन्सना खिळवून ठेवत आहे आणि अनपेक्षित नाट्याने भरलेले हे कथानक प्रदान करत आहे.