Home उद्योग भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेला बळकट करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेला बळकट करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

2 second read
0
0
13

no images were found

भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेला बळकट करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

मुंबई:भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) परिसंस्थेच्या विकासाला आणि वाढीला चालना देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) ने भारतातील आघाडीच्या एकात्मिक सुवर्ण प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या ‘ ऑगमाँट एंटरप्रायझेस लिमिटेड’ सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे.या भागीदारीचा मुख्य उद्देश ईजीआर निर्मिती, विमोचन, तरलता तरतूद, डिलिव्हरी आणि किंमत निश्चिती या क्षेत्रांतील ऑगमँटच्या कौशल्याचा लाभ उठवून एक्सचेंज-नियमन केलेल्या स्पॉट गोल्ड मार्केटला बळकट करणे हा आहे. दोन्ही संस्था बाजारातील सहभाग वाढवण्यासाठी, तरलता सुधारण्यासाठी आणि गुंतवणूकदार, सराफा व्यावसायिक तसेच इतर बाजार घटकांमध्ये ईजीआर चा स्वीकार वेगाने वाढवण्यासाठी मिळून काम करतील.

एनएसई द्वारे ४ मे २०२६ रोजी लाँच करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआरs) मुळे प्रत्यक्ष सोन्याचे एक्सचेंज-ट्रेडेड, डिमटेरियलाइज्ड सिक्युरिटीजमध्ये रूपांतर करणे शक्य होते, जे गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात ठेवले जाते. हे पारदर्शक किंमत निश्चिती, प्रत्यक्ष सोन्याचे विमोचन आणि एक्सचेंज फ्रेमवर्कद्वारे सोने कर्जाने देण्याची सुविधा सुलभ करते.एका अंदाजानुसार, भारतातील लोकांकडे खाजगी स्वरूपात साधारणपणे ३०,००० ते ३५,००० टन सोने आहे. ईजीआर गुंतवणूकदारांना सोने ठेवण्याची, व्यापार करण्याची, गहाण ठेवण्याची, विमोचन करण्याची आणि कर्जाने देण्याची परवानगी देऊन या सोन्याला एका नियमन केलेल्या यंत्रणेद्वारे औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आणण्याचा मार्ग उपलब्ध करून देते. ‘सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग’ यंत्रणेद्वारे, ईजीआर धारक सोन्याची मालकी आणि बाजारातील किमतीचा लाभ स्वतःकडे राखून आपले सोने सराफा उत्पादकांना कर्जाने देऊ शकतात.देशांतर्गत ईजीआर बाजाराच्या विकासामुळे नियमन केलेल्या एक्सचेंज फ्रेमवर्कद्वारे देशांतर्गत उपलब्ध सोन्याचा वापर वाढवून, आयात केल्या जाणाऱ्या सोन्यावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता देखील निर्माण होणार आहे.

श्री. श्रीराम कृष्णन, मुख्य व्यवसाय विकास अधिकारी (सीबीडीओ),एनएसई म्हणाले: “एक विश्वासार्ह आणि मजबूत सराफा बाजार पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी रिफायनर्सचा समावेश करणे आणि तरलता पुरवठादारांचा सहभाग असणे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.”श्री.केतन कोठारी, संचालक, ऑगमँट एंटरप्रायझेस लिमिटेड म्हणाले: “ज्याप्रमाणे यूपीआय ने कोट्यवधी लोकांना एका विश्वासार्ह डिजिटल परिसंस्थेशी जोडून पेमेंट व्यवस्थेत क्रांती घडवून आणली, त्याचप्रमाणे ईजीआर मुळे नियमन केलेल्या एक्सचेंज फ्रेमवर्कद्वारे सोन्याची साठवणूक, व्यापार, कर्ज देणे आणि विमोचन करणे शक्य होईल, ज्यामुळे भारतातील कुटुंबांकडे असलेल्या अथांग सोन्याच्या साठ्याला औपचारिक स्वरूप दिले जाऊ शकते.”

श्री. सुरेंद्र मेहता, राष्ट्रीय सचिव, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) म्हणाले: “ही भागीदारी एक्सचेंज-नियमन केलेल्या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सच्या माध्यमातून एक पारदर्शक, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सुवर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी एनएसई आणि ऑगमाँट यांच्यातील सामायिक वचनबद्धता दर्शवते.”फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन (एफआयए)च्या आकडेवारीनुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) हे कॅलेंडर वर्ष २०२५ मधील ट्रेडिंग व्हॉल्यूम (कॉन्ट्रॅक्ट्स) नुसार जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज ठरले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यावर भर

जिल्ह्यात प्रथमच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची तिमाही बैठक;आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण…