
no images were found
शिवाजी विद्यापीठात आजपासून दिव्यांगविषयक राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- शिवाजी विद्यापीठातील हिंदी, इंग्रजी विभाग व अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद (बिलासपुर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा प्रारंभ उद्या, शुक्रवारी (दि. ३) निलांबरी सभागृहात होत आहे. सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाचे डॉ. अमित कुमार, बिलासपुर येथील अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमित कुमार पाठक मार्गदर्शन करणार आहेत. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.
या चर्चासत्रात देशभरातून 90 हून अधिक संशोधक, प्राध्यापक सहभागी होत असल्याची माहिती चर्चासत्राचे समन्वय डॉ. मनोहर वासवानी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी दिली. या चर्चासत्रामध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.