
no images were found
‘तेनाली रामा’ मालिकेत तेनालीचे भूत पाहून तथाचार्यांची घाबरगुंडी उडाली!
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेत दरबारी कवी आणि हजरजवाबी तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज)च्या सुरस रम्य कथा सांगितल्या आहेत. पूर्वी विजयनगरमधून हकालपट्टी करण्यात आलेला तेनाली अलीकडच्या भागांमध्ये पुन्हा विजयनगर साम्राज्यात येऊन पोहोचला आहे आणि रात्र घालवण्यासाठी एका योग्य जागेच्या शोधात आहे.
आगामी भागांमध्ये, राजा कृष्णदेवरायाचा सेनापती तिम्मारसु (अमित पचोरी) याला समजते की तेनाली रामा विजयनगरला परतला आहे. तो तेनालीला लपून राहण्याचा इशारा देतो. कारण महामंत्री या नात्याने त्याच्याबद्दलची माहिती राजाला देणे हे त्याचे कर्तव्य आहे. पण, त्याचबरोबर, एक सच्चा मित्र म्हणून तो तेनालीला लपण्याची संधी देतो. हुशार तेनाली तथाचार्यांच्या (पंकज बेरी) घरात लपून बसतो. कारण, तेनाली आपल्या शत्रूच्याच घरात लपलेला असेल अशी कुणी शंका घेणार नाही, हे त्याला माहीत असते. तथाचार्यांचे सोबती धानी (सनी किश्नन) आणि मनी (सोहित सोनी) यांना ते भूत आहे असे वाटते! तिकडे राहून तेनाली गुपचूप समस्या सोडवत राहतो मात्र त्यामुळे गावात तो परतला असल्याची कुजबुज सुरू होते. तेनालीच्या ‘भुता’विषयी जेव्हा राजा तथाचार्यांकडून ऐकतो आणि तिम्मारसु आणि गावकऱ्यांकडून काही धागेदोरे मिळवतो, तेव्हा त्याची खात्री पटते की, तेनाली रामा जिवंत आहे आणि विजयनगर साम्राज्यात परतला आहे.
आपले पुनरागमन गुपित ठेवण्यात तेनालीला यश येईल का?
‘तेनाली रामा’ मालिकेत केंद्रवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली रामा कर्तव्य भावनेने आणि दृढ निर्धाराने विजयनगर साम्राज्यात परतला आहे. राज्यावर घोंघावणाऱ्या संकटापासून राज्याचे रक्षण करण्यावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. विजयनगरशी असलेली दृढ निष्ठा, त्याचे बुद्धीचातुर्य आणि सुजाणता यांच्या बळावर तो शत्रूच्या नजरेत न येता आव्हानांना तोंड देतो. या गोष्टीत खूप विनोद आहे आणि हलके-फुलके क्षण आहेत, कारण तेनालीचा शत्रू असलेले तथाचार्य तेनालीला भूत मानून बसतात!”