Home आरोग्य मिठातील आयोडिनच्या गुणांमुळे उंचावले जीवनमान – टाटा सॉल्टचे अग्रेसर स्थान

मिठातील आयोडिनच्या गुणांमुळे उंचावले जीवनमान – टाटा सॉल्टचे अग्रेसर स्थान

12 second read
0
0
18

no images were found

मिठातील आयोडिनच्या गुणांमुळे उंचावले जीवनमान – टाटा सॉल्टचे अग्रेसर स्थान

 भारताने लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. आयोडिन हे एक महत्त्वाचे मायक्रोन्युट्रियंट असून थायरॉइडच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावते. आयोडिनच्या कमतरतेमुळे आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डरचा (IDD) त्रास होऊ शकतो. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना विशेषतः लहान मुले व गरोदर स्त्रियांना या डिसऑर्डरचा त्रास होऊन त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा सर्वात गंभीर त्रास म्हणजे हायपोथायरॉइडिझम, ज्यामध्ये थायरॉइड पुरेसे हार्मोन्स तयार करण्यात अपयशी ठरतं. जर या आजारावर उपचार केले गेले नाही, तर ते जीवावर बेतू शकतं. यात थकवा, वजन वाढ, कोरडी त्वचा, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात. गरोदर स्त्रियांना आयोडिनच्या कमतरतेमुळे मूल जन्मतः मृत असणे, गर्भपात होणे, पोटातल्या बाळाचा विकास नीट न होणे, मतीमंदत्व अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.सुदैवाने आयोडिनची कमतरता एका सोप्या मार्गाने टाळता येऊ शकते. ते म्हणजे आयोडिनयुक्त मीठ. आयोडिनयुक्त मीठाचा रोजच्या स्वयंपाकात समावेश केल्याने रोजची आयोडिनची गरज पूर्ण होते व कमतरता होत नाही. आयोडिनचे महत्त्व लक्षात घेता भारतने देशात मीठ आयोडिनयुक्त असणे बंधनकारक केले असून हा उपक्रम सुरू करण्यासाठी टाटा सॉल्टने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१९८३ पासून टाटा सॉल्ट भारतातील आयोडिन कमतरतेच्या समस्येला तोंड देण्यात आघाडीवर आहे. व्हॅक्यूम- इव्हॅपोरेटेड आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करणारा पहिला ब्रँड या नात्याने टाटा सॉल्ट लाखो भारतीयांच्या घराघरात पोहोचले आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पॅकेज्ड फुड्स विभागाच्या अध्यक्ष दीपिका भान म्हणाल्या, ‘टाटा सॉल्ट गेल्या कित्येक वर्षांपासून आयोडिन कमतरतेच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आयोडिनचे योग्य प्रमाण असलेले मीठ पुरवण्यासाठी बांधील आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा ब्रँड लाखो भारतीयांचे स्वास्थ्य जपण्यासाठी दर्जेदार उत्पादने पुरवत आहे.’

       इंडिया आयोडिन सर्व्हे २०१८-१९ नुसार टाटा सॉल्टने आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डरचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील २१,४०६ घरांत करण्यात आलेल्या या सर्व्हेनुसार आयोडाइज्ड मिठाच्या वाढत्या वापरामुळे आयोडिनची कमतरता कमी झाली आहे. मात्र, या सर्व्हेनुसार राष्ट्रीय स्तरावर आयोडीनचे प्रमाण १५ पार्ट्स प्रति दशलक्ष (पीपीएम) समान किंवा त्याहून अधिक असलेले घरगुती कव्हरेज फक्त ७६.३ टक्के आहे. पंजाबमध्ये पुरेशा प्रमाणातील आयोडाइज्ड मिठाचे घरगुती कव्हरेज केवळ ८४.७ टक्के असून ६१.५ टक्के लोकांना आजही आयोडाइज्ड मिठाची माहिती नाही.

      टाटा सॉल्टद्वारे टाटा सॉल्ट लाइट आणि टाटा हिमालयन रॉक सॉल्ट अशी नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत व त्यांचे स्वास्थ जपण्यास मदत केली जात आहे. ब्रँडतर्फे आयोडिनयुक्त आहाराचे महत्त्व समाजातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक जागरूकता कॅम्पेन्सचे आयोजन केले जाते. आयोडिनची कमतरता कमी करण्याच्या भारताच्या लढ्यात सार्वजनिक जागरूकता आणि एकजुटीने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरले आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आयोडाइज्ड मिठाचा अवलंब वाढवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणे हे भावी पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…