
no images were found
संपुर्ण शहराचा सोमवारी एक दिवस पाणी पुरवठा बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी):- सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी बालिंगा सब स्टेशनच्या 110 केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरूस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी या पंपांचा विद्युत पुरवठा बंद रहाणार असलेने नदीतील पाणी उपसा होणार नाही. त्यामुळे संपुर्ण शहरातील ए, बी, वॉर्ड परिसरातील आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर,चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग, सी व डी वॉर्ड मधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर व ई वॉर्ड मधील खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक व सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवस बंद राहील. तसेच मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी होणार पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.