
no images were found
मालिका ‘भीमा’ने साजरा केला १०० एपिसोड्स पूर्ण करण्याचा क्षण!
एण्ड टीव्हीवरील सामाजिक ड्रामा ‘भीमा’ने १०० एपिसोड्स पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. ही लक्षवेधक मालिका धाडसी तरूणी भीमाच्या जीवनप्रवासाला सादर करते, जेथे ती समान अधिकारांसाठी लढण्यासोबत सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक आव्हानांचा सामना करते. लक्षवेधक कथानकासह मालिका ‘भीमा’ने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या अविश्वसनीय उपलब्धीला साजरे करण्यासाठी प्रतिभावान कलाकार जसे तेजस्विनी सिंग (भीमा), अमित भारद्वाज (मेवा) आणि स्मिता साबळे (धनिया) यांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रवासाला उजाळा दिला आणि प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. भीमाची शीर्षक भूमिका साकारणारी तेजस्विनी सिंग म्हणाली, ”भीमाची भूमिका साकारण्याचा प्रवास माझ्यासाठी असाधारण राहिला आहे. या भूमिकेने मला भरपूर काही शिकवले आहे, तसेच कलाकार म्हणून विकसित होण्यास मदत केली आहे. मी आमच्या टीमचे आभार मानते, प्रत्येकजण मला मार्गदर्शन व साह्य करतो. तसेच मी मालिका ‘भीमा’वर प्रेमाचा भरभरून वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांचे देखील आभार मानते. मी भीमा म्हणून माझा सर्वोत्तम अभिनय साकारण्याचे वचन देते. चला तर मग, एकत्र तिला पाठिंबा देऊया!”
मेवाची भूमिका साकारणारे अमित भारद्वाज म्हणाले, ”मालिका ‘भीमा’चा भाग असणे आणि १०० एपिसोड्स पूर्ण होताना पाहणे अभिमानास्पद व कृतज्ञ क्षण आहे. ही मालिका सामाजिक समस्यांचे निराकरण करते आणि भीमाचे शौर्य व निश्चयाच्या माध्यमातून परिवर्तनाला प्रेरित करते. अशा अर्थपूर्ण कथानकाप्रती योगदान देण्याचा अनुभव संपन्न राहिला आहे. प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम व कौतुक आम्हाला अधिक प्रभावी परफॉर्मन्स देण्यास प्रेरित करते. मी माझे सह-कलाकार व संपूर्ण टीमचे त्यांची अथक मेहनत व समर्पिततेसाठी आभार व्यक्त करतो, ज्यामुळे हा टप्पा शक्य झाला आहे.” धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्हणाल्या, ”मला मालिका ‘भीमा’चा भाग असण्यास आणि १०० एपिसोड्सचा हा उल्लेखनीय टप्पा साजरा करण्यास अत्यंत सन्माननीय वाटत आहे. हा प्रवास असाधारण राहिला आहे आणि महत्त्वपूर्ण सामाजिक समस्यांना प्रकाशझोतात आणणाऱ्या या मालिकेचा भाग असणे अत्यंत समाधानकारक आहे. मी आमची सर्वोत्तम टीम, अद्भुत सह-कलाकार आणि मालिका ‘भीमा’च्या कथानकाला मनापासून पसंत केलेल्या प्रेक्षकांचे आभार मानते. या टप्प्यामधून आमचे एकत्र आव्हानात्मक काम दिसून येते, जेथे आम्ही कथानकाच्या माध्यमातून प्रबळ संदेश देत आहोत. असे अधिक अर्थपूर्ण कथानक व संस्मरणीय क्षण पुढे देखील येतील अशी आशा व्यक्त करते.”