no images were found
श्रीमद् रामायणात आगामी महायुद्धाविषयी निकितिन धीर म्हणाले, ‘रावणाच्या अखेरच्या क्षणांमधील भावनिक पातळी उच्च राखण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली. ’
सोनी सबवरील श्रीमद् रामायण आता अखेरच्या टप्प्यात आहे. 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजता भगवान राम (सुजय रेऊ) आणि रावण (निकितिन धीर) यांच्यामधील महायुद्ध प्रासारीत केले जाईल. प्रेक्षकांसाठी ही दिव्य आनंदाची अनुभूती असेल. सध्या सुरु असलेल्या टप्प्याचा आता अंतिम टप्पा येतोय. यात महायुद्धात प्रभू राम लंकाधीश रावणाला पराजित करण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर एक नवा अध्याय सुरु होईल. जेव्हा प्रभू राम आणि सीता अयोध्येत परत येतील आणि रामराज्याची स्थापना होईल. रावणाची भूमिका करणारे निकितिन धीर यांच्याशी झालेल्या सहज चर्चेत त्यांनी आगामी महायुद्ध आणि या गर्भित पात्राची भूमिका करताना त्याची मानसिकता कशी समजून घेतली, याविषयीचे अनुभव सांगितले.
सोनी सबवर पुढील तासाभरात महायुद्ध दाखवले जाणार आहे. तुम्ही या नाट्याच्या शीर्ष बिंदूसाठी कशी तयारी केली?
महायुद्ध हे सध्याच्या टप्प्याचा पपरमोच्च बिंदू आहे. यात भरपूर अॅक्शन असून वाईटावर चांगल्याचा विजय, याचे हे प्रतीक आहे. हे एक उत्कट सादरीकरण असेल. त्यामुळे या सीनची तयारी करण्यासाठी मी माझ्यातील उच्चप्रतीची ऊर्जा वापरण्याकरिता शारिरीक शक्ती आणि सहनशक्तीवर काम केलं. रावणाच्या अखेरच्या क्षणांतील भावनिक तीव्रता दर्शवण्यासाठी आणि युद्धातील दृश्य प्रभावीपणे सादर करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.
रावणाची भूमिका करताना त्याचा संपूर्ण प्रवास पाहता, एवढे जटिल चरित्र छोट्या पडद्यावर जीवंत करताना सर्वात मोठे आव्हान आणि सुखद पैलू कोणते होते?
प्रामाणिकपणे सांगायचं तर रावणाची भूमिका करण्याचा प्रवास खूपच छान होता. मला वाटतं की, रावणाचे पात्र साकारणे, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. कारण हे पात्र अनेक पद्धतीने विक्राळ आणि भव्य आहे. हे नकारात्मक पात्र क्रोधी होते, पण त्याच्याकडे धैर्य, भक्ती आणि दृढ संकल्पही होता.
तुम्ही रावणाचे पारंपरिक पात्र साकारताना तुमचा वेगळा दृष्टीकोन कसा वापरला?
मी मालिकेचे शूटिंग सुरु केले, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की श्रीमद् रामायण एक पौराणिक मालिका आहे आणि पौराणिक कथा या आपली वेगळी व्याख्या न करता, वेगळा दृष्टीकोन न ठेवता जसास तसे दाखवले पाहिजे. शूटिंग सुरु करण्यापूर्वी मी रामायणाविषयी खूप वाचले आणि आम्ही मालिकेसाठी लेखक आनंद नीलकंठन यांच्या दृष्टीकोनातूनही समजले. कारण या विषयावर त्यांचे ज्ञान जास्त आहे. आमच्यासोबत विनोद शर्मा हेदेखील आहेत. ते हिंदू इतिहासातील तज्ञ आहेत. मला जेव्हा जेव्हा काही प्रश्न पडायचे, तेव्हा मी त्यांचा सल्ला घेत होतो. कोणतेही पात्र अधिक प्रभावी साकारण्यासाठी ज्ञान खूप महत्त्वाचे असते.
रावणाचे शारिरीक हावभाव साकरताना या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाशी कसे जुळवून घेतले?
शारीरिक हावभाव आणि बॉडी लँग्वेजच्या बाबतीत माझ्यासाठी हे खूप स्वाभाविक आहे. मी या पात्रासाठी मुद्दाम वजन वाढवले आहे. त्यामुळे स्क्रीनवर ते प्रभावी दिसले. या पात्रातील मानसिक परिवर्तन आणि पात्राचा दृष्टीकोन समजून घेण्याचीही तयारी केली. एखादे पात्र अधिक चांगले करण्यासाठी, ते उत्तम सादर करण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणे खूप आवश्यक आहे.
या मालिकेतील काही संस्मरणीय क्षण तुम्ही सांगू शकाल का, जे तुम्हाला खूप वेगळे वाटले?
अशी भूमिका करण्याचं माझं स्वप्न होतं. अखेर मला ती भूमिका करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. प्रेक्षकांनाही माझे पात्र खूप आवडले. रावणाविषयी मी दिग्दर्शक आणि लेखकांसोबत किती चर्चा केली, हे मला नेहमी आठवत राहिल. मी या पात्राला जवळून पाहिले, तेव्हा ते एक डार्क कॅरेक्टर नसून ग्रे असल्याचं जाणवलं. त्याच्या सगळ्याच भावना खूप तीव्र होत्या आणि हाच रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यातला मोठा फरक होता. श्रीराम प्रत्येक गोष्ट समजून, बोलत असत, कृती करत असत. मात्र रावणाच्या भावना, उदा. प्रेम, क्रोध, ईर्ष्या, या सगळ्याच्या त्याचा विनाश करणाऱ्या ठरल्या. तुम्ही एखाद्या पात्रातील जटिलता वाचता, ती समजून घेता तेव्हा कोणत्याही कलासारासाठी ते पात्र साकारणे भाग्याची गोष्ट असते. मानवाच्या अनेक पैलूंविषयीपण तुम्ही बरेच काही शिकता. रावणात असंख्य प्रकारच्या भावना सामावलेल्या आहेत.