no images were found
‘वसुधा’मध्ये नौशिन अली सरदारच्या मुलाच्या भूमिकेत अभिषेक शर्मा
झी टीव्ही आपली लक्षवेधी नवीन मालिका ‘वसुधा’च्या सुरूवातीसाठी सज्ज असून विभिन्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या दोन अतिशय वेगळ्या विचारांच्या व्यक्तिरेखा जेव्हा एकमेकांसमोर अगदी अनपेक्षितपणे येऊन ठाकतात तेव्हा काय होते याचा शोध ह्या मालिकेतून घेतला जाईल. आणि आम्ही इथे परस्परविरोधी म्हणून एखाद्या साधारण प्रेमकथेप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी यांच्याबद्दल बोलत नसून आग आणि पाणी असलेल्या दोन स्त्रियांबद्दल बोलत आहोत. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अगदी निराळा आहे. त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि त्यांचे जीवनात विचार करण्याचे आणि वागण्याचे पूर्णपणे भिन्न तरीके आहेत. अरविंद बब्बल प्रॉडक्शन्स निर्मित ‘वसुधा’ मध्ये हलकेफुलके क्षण, भावनिक खोली आणि विचारधारा व स्वभावांचा तीव्र संघर्ष पाहायला मिळेल.
लोकप्रिय अभिनेत्री नौशिन अली सरदार आणि पदार्पण करत असलेली प्रिया ठाकूर ह्या मालिकेत अनुक्रमे चंद्रिका आणि वसुधा यांच्या भूमिका साकारणार आहेत. त्यांच्यासोबत गुणी अभिनेता अभिषेक शर्मा चौहान परिवाराचा आदर्श मुलगा देवांश सिंग चौहानची भूमिका साकारेल. आपल्या वडिलांच्या अंगची सहानुभूती आणि आईची शिस्त यांचा सुयोग्य मिलाफ त्याच्यामध्ये आहे. कठोर परिश्रम, माणूसकी आणि लोकांना दुसरी संधी देण्यामध्ये त्याचा विश्वास आहे. आपली आई चंद्रिकाबद्दल त्याच्या मनात नितांत आदर असून त्याचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना तो अढळ पाठबळ देतो.
अभिषेक शर्मा म्हणाला, “देवांश सिंग चौहानच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू असून सहानुभूती आणि शिस्त त्याच्या अंगी आहे. नौशिन मॅमसारख्या उत्तम अभिनेत्रीसोबत काम करण्याचा अनुभव निश्चितच समाधानकारक असेल. देवांशची व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी रोमांचक आहे कारण त्याच्या व्यक्तिरेखेला खोली आणि जटिलता आहे. तो आपल्या आईचा नितांत आदर करतो आणि त्याचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो. यातून त्याची दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती आणि तत्त्वांना चिकटून राहण्याची वृत्ती स्पष्ट होते. ही भूमिका जीवंत करण्यासाठी मी उत्सुक असून आशा करतो की प्रेक्षकांना त्याचा हा प्रवास, मूल्ये आणि आयुष्यातील गुंतागुंतीला सामोरे जाण्याचा दृष्टीकोन आपलासा वाटेल. आम्ही एकत्र गुंफलेल्या ह्या व्यक्तिरेखा आणि कथानकाचा समृद्ध अनुभव सर्वांनी घ्यावा यासाठी मी उत्सुक आहे.”
ह्या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये प्रचंड फरक असला तरी काय वसुधा चंद्रिकाला प्रभावित करू शकेल? काय त्या दोघी एकाच घरात राहू शकतील? त्यांच्या जगामध्ये जेव्हा संघर्ष होर्इल तेव्हा काय होर्इल? पहा ‘वसुधा’, ही मालिका वाहिनीच्या उत्तम कॉन्टेन्ट मिलाफामध्ये आणखी एक नवीन रंगत आणेल!