Home मनोरंजन एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भीमा’ आणि ‘अटल’मध्‍ये रोमांचक ड्रामा!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भीमा’ आणि ‘अटल’मध्‍ये रोमांचक ड्रामा!

1 min read
0
0
51

no images were found

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भीमा’ आणि ‘अटल’मध्‍ये रोमांचक ड्रामा!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भीमा’ आणि ‘अटल’ यांचे नवीन एपिसोड्स रोमांचक व नाट्यमय कथानकासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘अटल’मधील एपिसोडबाबत सांगताना धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, ”भीमा शाळेत जायला सुरूवात करते, ज्‍यामुळे कैलाशा बुआ तिची आई धनियाला तिच्‍या मुलीचे स्‍वप्‍न साकारण्‍याची संधी देण्‍यासाठी दुष्‍टपणे शिक्षा करते. भीमाला विरोध करणारे शालेय मुख्‍याध्‍यापक शाळेमधून तिला काढून टाकण्‍याची धमकी देतात. शाळेतील शिक्षक देखील तिला तिचे शिक्षण पूर्ण करण्‍यापासून विरोध करतात आणि स्थिती बिकट होऊन जाते. भीमावर अनावश्‍यक कामांचा भार पडतो, ज्‍यामुळे तिच्‍या शिक्षणामध्‍ये अडथळा येतो. तिच्‍या निदर्शनास येते की तिच्‍या आईला दुखापत झाली आहे, तिला तिच्‍या शिक्षणासाठी कुटुंबियांनी केलेल्‍या त्‍यागाची जाणीव होते. या सर्व दुविधेदरम्‍यान बाबा साहेब भीमासाठी मार्गदर्शक ठरतात, ते तिला या अडथळ्यांवर मात करण्‍यास आणि तिचे शिक्षण सुरू ठेवण्‍यास प्रेरित करतात.” एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘अटल’मधील एपिसोडबाबत कृष्‍णा देवीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ”ब्रिटीश अधिकारीने मोहल्‍लामधील सर्वांना सात दिवसांच्‍या आत त्‍यांची घरे खाली करण्‍याची चेतावणी दिल्‍यानंतर अटल सर्वांचे स्‍थलांतर टाहण्‍यासाठी ब्रिटीश सरकारविरोधात लढा सुरू ठेवतो. त्‍याच्‍या या संकल्‍पामुळे क्रिष्‍णन बिहारीला राग येतो, जे त्‍याला चेतावणी देतात की अटलच्‍या कृतींमुळे मोहल्‍लामधील सर्वांना व त्‍याला स्‍वत:ला धोका निर्माण होईल. दरम्‍यान कृष्‍णा देवी अटलला पाठिंबा देते, क्रिष्‍णन बिहारी घरामध्‍ये फाळणी करण्‍याचे ठरवतात. दरम्‍यान, अटलची एका माणसाशी भेट होते, जो दीर्घकाळापासून ब्रिटीश सरकारकडून थकीत भरपाई मागत असतो, पण त्‍याला अन्‍यायकारकपणे त्‍याचा अधिकार नाकारण्‍यात आलेला असतो. अटल खात्री घेतो की तो माणूस त्‍याची गाथा मोहल्‍लामधील लोकांना सांगेल. त्‍यानंतर, सिपाही त्‍या माणसाला मारहाण करतात आणि त्‍याला बळजबरीने थकीत भरपाई मिळाल्‍याचे जाहीर करण्‍यास सांगतात. इतक्‍या अडचणींचा सामना केल्‍यानंतर देखील अटल पुन्‍हा ब्रिटीश अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्‍यांच्‍या निर्णयांना आव्‍हान करतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…