
Oplus_131072
no images were found
कागल चेक पोस्टवर फास्टॅग मुळे व्यावसायिक वाहनांची होणार एका मिनिटात मार्ग मोकळा
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल बॉर्डर चेक पोस्टवर फास्टॅगमुळे आता वाहनांना लवकर मार्ग मिळणार आहे. या तपासणी नाक्यावर रोकड व्यवहारांपेक्षा जलद व्यवहार होणार असून विशेषतः व्यावसायिक वाहनांची एका मिनिटात मार्ग मोकळा होणार आहे.
कागल सीमा तपासणी नाका हा महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड (एमबीसीपीएनएल) या कंपनीच्या अखत्यारीत आहे. ही कंपनी राज्यातील विविध ठिकाणी २३ सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि एकत्रीकरणाच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र परिवहन खात्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कागल सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक बाजूला १० लेन आहेत. यातील ७ लेन व्यावसायिक वाहनांच्या प्रक्रियेसाठी आहेत तर तीन लेन खाजगी वाहनांच्या प्रक्रियेसाठी आहेत. फास्टॅगचा वापर केल्यामुळे या लेनवर व्यावसायिक वाहनांची प्रक्रिया एका मिनिटात केली जाईल. तसेच रोख व्यवहारापेक्षा जलद व्यवहार होईल.
याशिवाय अन्य सीमा तपासणी नाक्याप्रमाणे या नाक्यावरही ड्रायव्हर, क्लिनर आणि प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्रक चालकांसाठी शयनगृह / विश्रांती कक्ष, पुरुष आणि महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, डिटेन्शन एरिया / पार्किंग एरिया, कॅन्टीन सुविधा, टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान, ढाबा, चहाचे दुकान, पीयूसी केंद्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सीमा तपासणी नाक्यावर बर्ड आय व्ह्यू कॅमेरा, पीटीझेड कॅमेरे, लेन कॅमेरा, बूथ कॅमेरा इत्यादींचा वापर करून संपूर्ण निगराणी केली जात आहे. परिवहन, उत्पादन शुल्क आणि जीएसटी विभागांचे आयुक्त या प्रक्रियेवर निरीक्षण करत आहेत.
महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा एकात्मिक सीमा तपासणी प्रकल्प असून तो राज्यातील २३ ठिकाणी सुरू आहे. यातील २२ सीमा तपासणी नाके कार्यरत आहेत तर इन्सुली येथील २३ वा नाका लवकरच कार्यान्वित होईल. हे सीमा तपासणी नाके परिवहन विभागाच्या मालकीचे आहेत.
हा प्रकल्प परिवहन विभाग व उत्पादन शुल्क विभागासाठी आहे. हे दोन्ही विभाग सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करतात. तसेच या नाक्यावरील वाहनांचा वाहनांच्या डेटाचा वापर करून वस्तू व सेवा कर विभागसुद्धा (जीएसटी) कर चोरी करणाऱ्यांचा शोध घेते. त्यामुळे या विभागाच्या दृष्टीने येथील डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.