Home औद्योगिक आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सच्या मोबाइल अॅप आयप्रू एज (IPRU Edge) ने 98.1% इन्शुरन्स एजंटना दिले एकाच दिवशी कमिशन

आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सच्या मोबाइल अॅप आयप्रू एज (IPRU Edge) ने 98.1% इन्शुरन्स एजंटना दिले एकाच दिवशी कमिशन

18 second read
0
0
24

no images were found

आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सच्या मोबाइल अॅप आयप्रू एज (IPRU Edge) ने 98.1% इन्शुरन्स एजंटना दिले एकाच दिवशी कमिशन

      

 

आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सने सल्लागारांसाठी खास तयार केलेला आयप्रू एज अॅप वापरणाऱ्या सल्लागारांच्या उत्पादकतेत H1-FY2025 मध्ये 37% वाढीचा अनुभव आला. ज्यामुळे त्यांच्या कमाईतही वाढ झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयप्रू एज अॅप (IPRU Edge) वापरणाऱ्या 98.1% एजंटना एकाच दिवशी त्यांचे कमिशन प्राप्त झाले.

आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स ही पहिली जीवन विमा कंपनी आहे, जी निवडक वितरकांना एकाच दिवशी कमिशन देते. कंपनीकडे 2 लाखांहून अधिक इन्शुरन्स सल्लागारांचे भक्कम जाळे आहे. कंपनीचे 61% प्रमुख सल्लागार आता अॅपचा सक्रियपणे वापर करत आहेत. ज्यामुळे त्यांना व्यवसाय वाढवण्यास मदत मिळते.

हे मोबाइल अॅप एजंटसाठी एक कार्यालयासारखे कार्य करणारे टूल आहे. जे त्यांना नवीन व्यवसायाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यात प्रत्येक कामासाठी इन्शुरन्स एजंटना प्रशासकीय कार्याच्या वेळखाऊ कामात गुंतण्याची गरज नाही.

आयप्रू एज अॅप (IPRU Edge) रिअल-टाइम के. वाय. सी. प्रमाणीकरण सुलभ करते आणि ओसीआर तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कागदपत्रांरहित खरेदीचा अनुभव मिळतो. हे अॅप लहान शहरे आणि गाव खेड्यांमध्ये विखुरलेल्या गुंतवणूक सल्लागारांसाठी उपयुक्त आहे.

H1-FY2025 मध्ये, कंपनीने आपल्या एजन्सी चॅनेलकडून प्राप्त झालेल्या रिटेल वेटेड प्रिमियममध्ये 49% ची वार्षिक वाढ नोंदवली, जी अॅपद्वारे दिलेल्या सुविधेमुळे शक्य झाली.

याविषयी आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सच्या विपणन विभागाचे प्रमुख (प्रॉपायटरी चॅनेल)  श्री. शोबी सॅम म्हणाले, “आमचा आयप्रू एज मोबाइल अॅप (IPRU Edge) इन्शुरन्स एजंटना व्यवसाय वाढवण्यास सक्षम करत आहे. H1-FY2025 मध्ये आम्ही पाहिलेली 37% ची उत्पादकता वाढ याचेच एक उदाहरण आहे. त्याचबरोबर आयप्रू एज ( IPRU Edge ) अॅप वापरणाऱ्या 98.1% सल्लागारांना एकाच दिवशी कमिशन मिळाले. या उपक्रमांमुळे आम्हाला देशातील सर्वात सल्लागार-मैत्रीपूर्ण जीवन विमा कंपनी बनण्यास मदत झाली आहे.”

“आम्ही बदलत्या तंत्रज्ञानाचे पर्याय राबवले आहेत. ज्यामुळे बचत व्यवसाय क्षेत्रातील 50% पॉलिसी एकाच दिवशी इश्यू केल्या गेल्या,” असेही ते पुढे म्हणाले.

आयप्रू एज (IPRU Edge) अॅप सल्लागारांना प्रशासकीय कामांपासून मुक्त ठेवून नवीन व्यवसाय विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. या अॅपच्या मदतीने सल्लागार नवीन व्यवसायासाठी लॉग इन करू शकतात. आम्ही सल्लागारांना नवीन व्यवसायाच्या संधी, मागणी निर्माण करणे यासारख्या सेवा देखील प्रदान करतो. हे सल्लागारांना त्यांच्या ग्राहकांची प्रभावीपणे सेवा देण्यास मदत करते. हा मोबाइल अॅप आमच्या सल्लागारांना त्यांच्या व्यवसायाची आणि कमाईची तपशीलवार माहितीही देते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…