no images were found
बारामतीतील व्यापाऱ्यांनी नियोजित मेळावा रद्द !
बारामतीत आज शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते. त्यामध्ये होलार समाज मेळावा, बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा, बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि बारामतीतील वैद्यकीय व्यवसायिकांचा मेळावा अशा चार मेळाव्यांपैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला.
अशा स्वरूपाचे पत्र शरद पवारांना मिळाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली, मात्र शरद पवारांनी वकिलांच्या मेळाव्यात याविषयीची खंत व्यक्त करताना आपल्याला याचे आश्चर्य वाटल्याचे सांगितले. ते म्हणाले, बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवतो. बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अगदी तीन-तीन दिवस देखील घालवतो. आज बारामतीत व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होती. मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे पत्र मिळाले. एक प्रकारची चिंता त्यांच्या मनात होती असे वाटते. कारण त्यामुळे एकतर हा कार्यक्रमच न घेतलेला बरा असे त्यांना वाटले.
गेल्या पन्नास वर्षात मला कधी असे कळवले नव्हते, परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मीटिंग घेणे शक्य नाही असे कळवले. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायला ते घाबरतात असे यातून दिसून आले, त्याची मला खंत वाटते. पवार यांनी ही माहिती दिल्यानंतर वकिलांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.