
no images were found
नाशिकमध्ये आगीचा थरार, गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने क्षेपणास्त्र सारखे ब्लास्ट
नाशिक : आगीच्या सत्राने आज नाशिक हादरले. नाशिकमध्ये वाहनाला आग लागल्याची तिसरी घटना घडली आहे. मुख्यमंत्री हे नाशिकमधून निघत नाही तोच नाशिकच्या मालेगाव-मनमाड रोडवर मोठी आगीची घटना घडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणार वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. याच वेळी आग लागल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर 20 ते 25 फुट सिलेंडर हवेत उडाले. त्यामुळे नागरीकांत घबराट पसरली.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी तब्बल दोन्ही बाजूने ५ – ५ किलोमीटर पर्यन्त वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर टँकर आणि खाजगी बसचा अपघात आणि त्यांनंतर बसला लागलेली आगीची घटना समोर आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच वणी गडावर जाणाऱ्या शासनाच्या बसला भीषण आग लागली होती. आणि त्यानंतर मालेगाव-मनमाड येथील घटना समोर आली आहे.
दरम्यान या दोन्ही घटना ताज्या असतांना मालेगावकडून मनमाडकडे जात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीला कानडगाव शिवारात आग लागली होती.
आग लागताच अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले होते, मात्र आग विझवण्याची प्रक्रिया सुरू करत असतांनाच सिलेंडरचा स्फोट झाला होता. गाडीत असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने जवळपास 20 ते 25 फुट हवेत सिलेंडर उडाले होते. ही संपूर्ण घटना परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली होती.
दरम्यान, काही दिवसांपासून वाहनांना आग लागल्याची घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून यावर उपायोजना करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.