no images were found
बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
कोल्हापूर : चंद्रे (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष “बी. एस.” पाटील (बळवंत सदाशिव पाटील) यांचा बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, शिक्षण प्रसारक मंडळ रायबाग अध्यक्ष अमरसिंह पाटील, आमदार निलेश लंके ” आदींसह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
113 व्यक्तींना देण्यात आला पुरस्कार –नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण तीन राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 113 व्यक्तींना करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव (कर्नाटक) येथील अशोक नगरमधील धर्मनाथ भवनमध्ये शनिवारी ( दि. ८ ऑक्टोबर २०२२) रोजी सकाळी १२ ते ३ या वेळेत पार पडला.
यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते, मठाधीश, पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य – चंद्रे येथील रहिवासी असलेले बी. एस. पाटील यांनी अल्पावधीतच बांधकाम व सामाजिक क्षेत्रात जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. बी. एस. यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.