Home शासकीय चला कोल्हापूर जिल्हा बाल कामगार मुक्त करुया

चला कोल्हापूर जिल्हा बाल कामगार मुक्त करुया

3 second read
0
0
55

no images were found

चला कोल्हापूर जिल्हा बाल कामगार मुक्त करुया

 

कोल्हापूर  : 12 जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निर्दशनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि घोडके यांनी केले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 ते 50 हजार रुपये पर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त, 579, ई, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 0231-2653714 वर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…