no images were found
योगेश त्रिपाठी सांगत आहेत दरोगा हप्पू सिंगच्या मोठ्या चाहतावर्गाबाबत!
योगेश त्रिपाठी यांनी एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्पू सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिग्नेचर ढेरपोट्या, ट्विस्टेड मिशनी आणि प्रख्यात संवाद ‘अरे दादा’ यासह योगेश यांनी हप्पू सिंगला चाहत्यांमध्ये लोकप्रिय बनवले आहे. हा काल्पनिक पोलिस अधिकारी साधारण आहे, तसेच तो गुन्हेगारांना पकडण्याचे काम टाळण्यामध्ये कुशल आहे आणि कायद्याचे पालन करण्यापेक्षा त्याची नऊ मुले व कुटुंबाचे पालन करण्याकडे अधिक वेळ व्यतित करतो. पडद्यामागे योगेश हप्पूच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळे आहेत, पण पडद्यावर ते भूमिका इतक्या कुशलतेने साकारतात की चाहत्यांना प्रश्न पडतो, ते वास्तविक जीवनात हप्पू सारखे असतील का? योगेश यांनी मुलाखतीदरम्यान अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत:
हप्पू सिंगच्या चाहत्यांना त्याची अद्वितीय शैली आवडते. मिशीचा आकार कायम ठेवण्यसाठी तुमचे सिक्रेट काय आहे?
अरे दादा! या मिशीसाठी कोणत्याही पोलिस जीपपेक्षा अधिक तेलाचा वापर होतो (हसतात). यासाठी काहीसे ग्रुमिंग केले जाते, ज्यामधून मिशीला आकर्षक लुक मिळतो आणि अभिमानास्पद वाटते. प्रामाणिकपणे सांगायचे तर ही कृत्रिम मिशी आहे, जी मी शूटिंगसाठी वापरतो. पण दशकापासून ही मिशी वापरत असल्यामुळे मला खरंच मिशी असल्यासारखे वाटते.
या मालिकेमध्ये सर्वात आव्हानात्मक काय आहे – गुन्हेगारांना पकडणे की घरी नऊ मुलांचा सांभाळ करणे?
तुम्ही नऊ मुलांचा सांभाळ करू शकता तर गुन्हेगारांना पकडणे फारसे मोठे काम नाही (हसतात). पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर, कधी-कधी, या नऊ मुलांना सांभाळणे कोणत्याही गँगस्टरला पकडण्यापेक्षा अधिक आव्हानात्मक आहे. दरोगा म्हणून तुम्हाला पोलिस स्टेशनपेक्षा घरामध्ये अधिक शांत राहावे लागते (हसतात).
हप्पू सिंग पडद्यामागे देखील फूडी आहे का?
निश्चितच! मला कानजी वडा व समोसे खूप आवडतात आणि मी नेहमी त्यांचा आस्वाद घेतो. हप्पूप्रमाणे मी देखील फूडी आहे. मला खूश करायचे असेल तर फक्त खायला द्या.
हप्पू सिंगप्रमाणे वास्तविक जीवनात देखील विलक्षण गोष्टी घडतात का?
कधी-कधी, हो! मी एखाद्यासोबत सौदेबाजी करत असताना हप्पूप्रमाणे वागत असल्यासारखे वाटते आणि मी त्याच्या शैलीमध्ये बोलण्यास स्वत:ला रोखू शकत नाही. दीर्घकाळापासून हप्पूची भूमिका साकारत असल्यामुळे त्याची विलक्षणता माझ्या वास्तविक जीवनात देखील येऊ लागली आहे.
तुमच्या परफॉर्मन्ससंदर्भात कठोर समीक्षक कोण आहेत?
माझी पत्नी व मुलगा! ते मालिका पाहतात आणि मला त्वरित अभिप्राय देतात. कधी-कधी माझी मुले सांगतात, “पप्पा, ते मजेशीर नव्हते” आणि माझी पत्नी मला कधी-कधी पडद्यावर अधिक उत्साही असण्यास सांगते. घरामध्ये मी नेहमी कामात असतो.
तुम्हाला रस्त्यांवर हप्पू सिंग म्हणून ओळखतात का?
दररोज! लोक मला ‘हप्पू’ म्हणून हाक मारतात आणि दरोगा हप्पूप्रमाणे वागण्यास किंवा माझे प्रसिद्ध संवाद म्हणण्यास सांगतात. काहीजण मस्करीत विचारतात की, ते माझ्यासाठी कोणत्या न्योच्छावरची व्यवस्था करू शकतात. मला ते खूप आवडते. लोकांना वास्तविक जीवनात देखील हसवण्याचा आनंद अद्वितीय आहे.
तर मग, हप्पू सिंगची भूमिका साकारत असल्यामुळे तुम्ही वास्तविक जीवनात देखील न्योच्छावर किंवा गिफ्ट्स स्वीकारत आहात का?
अरे नाही! हप्पू सिंग आणि मला फूड आवडत असले तरी न्योच्छावर फक्त त्याच्यासाठी आहे. सेटवर असताना मला जिलेबी व समोसे अशा स्वरूपात टीमकडून खूप लाच मिळते. त्यांना हप्पूला (आणि मला) कशाप्रकारे खूश ठेवावे हे चांगले माहित आहे. ज्यामुळे, मला वाटते की स्नॅक्सच्या बाबतीत तरी हप्पूचा माझ्यावर काहीसा प्रभाव पडला आहे.
तुम्ही खूप लांबचा पल्ला गाठला आहे, पण तुम्हाला इंडस्ट्रीमधील पहिली नोकरी आठवते का?
मी माझा पहिला पगार कधीच विसरणार नाही. रंगभूमीवरील नाटकासाठी ६०० रूपये पगार मिळाला होता. त्याकाळी, अभिनय फक्त आवड नव्हती तर गरज होती. जीवन खडतर होते आणि प्रत्येक पैसा महत्त्वाचा होता. रंगभूमी व पथनाट्ये क्रिएटिव्ह आऊटलेट्ससोबत उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत होते. ते ६०० रूपये मोठी रक्कम नव्हती, पण लाइफलाइन होती, ज्यामुळे मला मुलभूत गरजांची पूर्तता करण्यास आणि माझा निर्धार कायम ठेवण्यास मदत झाली.
हप्पूचा त्याची पत्नी राजेशकडून सतत अपमान होत असतो, तर मग योगेशसाठी घरी वागणूक कशी आहे?
मला सांगावेसे वाटते की, माझी वास्तविक जीवनातील पत्नी मालिकेमधील राजेशप्रमाणे माझा अपमान करत नाही. मला फार काळापूर्वी समजले होते की, शांतता पाहिजे असेल तर होम मिनिस्टर म्हणजेच माझ्या पत्नीचे ऐकले पाहिजे. पण होय, मालिकेमध्ये राजेश हप्पूची काळजी घेते, अगदी तसेच माझी पत्नी देखील माझी काळजी घेते.
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या धमाल कलाकारांसोबत काम करताना कसे वाटत आहे?
खूप चांगले वाटते! आम्ही मोठ्या कुटुंबासारखे आहोत. आमच्यामधील केमिस्ट्री उत्तम आहे आणि आम्ही नेहमी हसत असतो. कधी-कधी, आम्ही सीनदरम्यान हसून-हसून इतके लोटपोट होतो की परत सीन शूट करावा लागतो. आमच्यामधील नाते व केमिस्ट्री पडद्यावर दिसून येते.
शेवटचे म्हणजे, हप्पू सिंगवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या तुमच्या चाहत्यांना एखादा संदेश?
अरे माझ्या प्रिय चाहत्यांना, तुमच्याशिवाय हा दरोगा कोणीच नाही. हसत राहा, आनंदी राहा आणि हप्पू सिंगवर प्रेमाचा वर्षाव करत राहा. आम्ही तुम्हाला अधिक हसवून-हसवून लोटपोट करण्याची खात्री देतो. या प्रेमाच्या वर्षावासाठी तुम्हा सर्वांचे आभार!