no images were found
सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिकेत बानीने घटस्फोटाचे कागद रजतला दिले
सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिकेत बानी या एका महत्त्वाकांक्षी तरुणीची गोष्ट सांगितली आहे. आर्थिक अडचणींवर मात करून आपल्या कुटुंबाचे जीवनमान उन्नत करण्यासाठी झटणारी ही मुलगी आहे. अलीकडच्या भागांमध्ये बानीचे कुटुंब म्हणजे खन्ना परिवार लावण्या (भाविका चौधरी)च्या घरी राहायला गेला आहे, जिकडे बानीचा नवरा रजत (आकाश आहुजा) आधीपासूनच राहात आहे. बानीचा परिवार लावण्याच्या खर्चिक जीवनशैलीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा बानी घरी केलेले देशी जेवण त्यांच्यासाठी घेऊन येते. यामुळे चिडलेली लावण्या रजतला त्याची इच्छा नसताना बानीला फैलावर घ्यायला भाग पाडते.
आगामी भागांत, बानी आपला वकील माहिर (गौरव शर्मा) याच्या मदतीने घटस्फोटाची नोटिस तयार करून घेते आणि ते कागद रजतला देते. लावण्याला धक्का बसतो पण ती मनातून सुखावते. रजतला मात्र जबर धक्का बसतो आणि तो कोसळतो. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत कोर्टात सुनावणी होते आणि कोर्ट बानी आणि रजतला सहा महीने एकत्र राहून जुळवून घेण्याचा प्रयत्न करायला सांगते. या अनपेक्षित कलाटणीमुळे लावण्या आणि रजत चक्रावून जातात, तर कुटुंबाला मात्र यातून काही तरी चांगला मार्ग निघेल असे वाटते.
ही शेवटची संधी बानी आणि रजतला पुन्हा एकत्र आणणार का? की लावण्याच्या कारस्थानामुळे ते एकमेकांपासून आणखी दुरावणार?
या मालिकेत बानीची भूमिका करणारी अमनदीप सिद्धू म्हणते, “बानीच्या मते त्यांचे नाते संपुष्टात आले आहे कारण तिला खरोखर असे वाटते की, रजतने तिच्याऐवजी लावण्याची निवड केली आहे. ती मनातून दुखावली आहे आणि आपली फसवणूक झाल्याचे तिला दुःख आहे. घटस्फोटाच्या कार्यवाहीमुळे परिस्थिती आणखीनच गुंतगुंतीची होते. त्यात लावण्याच्या कारवायांमुळे बानीसाठी अडचणी वाढतच आहेत. मला वाटते हा गुंता सोडवण्याचा मार्ग एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे हाच आहे. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याचा आदेश केल्यामुळे आता थोडी आशा वाटते आहे की हा सहवास त्यांना एकमेकांशी बोलण्याची आणि गैरसमज दूर करण्याची संधी देईल.”